ISL स्पर्धेत चेन्नईयीन एफसीचा निसटता विजय

सामन्यातील निर्णायक गोल 31व्या मिनिटास आघाडीपटू लुकास गिकिएविच (Lukasz Gikiewicz) याने नोंदविला.
ISL स्पर्धेत चेन्नईयीन एफसीचा निसटता विजय

Lukasz Gikiewicz in ISL

Dainik Gomantak

पणजी: माजी विजेत्या चेन्नईयीन एफसीने (Chennaiyin FC) इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेच्या आठव्या मोसमात मागील पराभवातून सावरताना रविवारी जमशेदपूर एफसीवर (Jamshedpur FC) 1-0 फरकाने निसटता विजय मिळविला. सामना बांबोळी (Bambolim) येथील ॲथलेटिक स्टेडियमवर झाला.

<div class="paragraphs"><p>Lukasz Gikiewicz in ISL</p></div>
'एफसी' गोवाची पिछाडीवरून आघाडी..

सामन्यातील निर्णायक गोल 31व्या मिनिटास आघाडीपटू लुकास गिकिएविच (Lukasz Gikiewicz) याने नोंदविला. पोलंडच्या या 34 वर्षीय खेळाडूचा आयएसएल (ISL) स्पर्धेतील हा पहिलाच गोल ठरला. जमशेदपूरने तुल्यबळ लढत दिली, पण पूर्वार्धात गोल स्वीकारल्यामुळे त्यांना सामना गमवावा लागला.

चेन्नईयीनने रविवारी विजय मिळविला, पण पहिल्या चार संघात स्थान मिळविणे त्यांना शक्य झाले नाही. नऊ लढतीतील त्यांचा हा चौथा विजय ठरला. त्यांचे आता 14 गुण झाले आहेत. केरळा ब्लास्टर्स (Kerala Blasters) व एटीके मोहन बागान (ATK Mohun Bagan) यांचेही समान 14 गुण आहे. गोलसरासरीत केरळा ब्लास्टर्स तिसऱ्या, एटीके मोहन बागान चौथ्या, तर चेन्नईयीनला पाचवा क्रमांक मिळाला. जमशेदपूरला स्पर्धेतील दुसरा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे नऊ लढतीनंतर त्यांचे 13 गुण कायम राहिले व त्यांना सहाव्या स्थानी घसरावे लागले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com