आव्हान संपलेले चेन्नई कोलकातासाठी धोकादायक

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 29 ऑक्टोबर 2020

स्पर्धेतले आव्हान संपुष्टात आलेले असल्याने आता गमावण्यासारखे काहीच नसलेला चेन्नईचा संघ आज होणाऱ्या सामन्यात कोलकाता नाईटरायडर्ससाठी धोकादायक ठरू शकतो.

दुबई:  स्पर्धेतले आव्हान संपुष्टात आलेले असल्याने आता गमावण्यासारखे काहीच नसलेला चेन्नईचा संघ आज होणाऱ्या सामन्यात कोलकाता नाईटरायडर्ससाठी धोकादायक ठरू शकतो. बाद फेरीच्या आशा कायम ठेवण्यासाठी कोलकाताला मात्र विजयाठी शर्थ करावी लागण्याची शक्‍यता आहे.

चेन्नई संघावर आता कोणतेही दडपण नाही, त्यामुळे ते अधिक धोकादायक ठरू शकतात. त्यांनी अगोदरच्या सामन्यात विराट कोहलीच्या बंगळूर संघाला असाच पराभवाचा धक्का दिला होता, त्यामुळे कोलकाताला सावधगिरी बाळगावी लागणार आहे. कोलकाताकडे निष्णात खेळाडू असूनही, त्यांच्या कामगिरीत चढ-उतार होत राहिले आहेत. 

संबंधित बातम्या