ISL 2020-21 नॉर्थईस्टसमोर चेन्नईयीनचा अडसर

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 17 फेब्रुवारी 2021

स्पर्धेचा समारोप चांगली कामगिरी करताना ते प्ले-ऑफ फेरीसाठी इच्छुक असलेल्या नॉर्थईस्ट युनायटेडसमोर अडसर ठरू शकतात.

पणजी ःइंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेत दोन वेळा विजेतेपद मिळविलेल्या चेन्नईयीन एफसीचे आव्हान संपुष्टात आले आहे, बाकी दोन्ही सामने त्यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. स्पर्धेचा समारोप चांगल्या कामगिरी करताना ते प्ले-ऑफ फेरीसाठी इच्छुक असलेल्या नॉर्थईस्ट युनायटेडसमोर अडसर ठरू शकतात.

चेन्नईयीन व नॉर्थईस्ट युनायटेड यांच्यातील सामना  बांबोळी येथील जीएमसी स्टेडियमवर खेळला जाईल. सलग सात सामने अपराजित असलेल्या नॉर्थईस्टने 17 सामन्यांतून 26 गुण नोंदविले आहेत. चेन्नईयीनविरुद्ध पूर्ण तीन गुण मिळाल्यास त्यांचा उपांत्य फेरीचा दावा भक्कम होईल. चेन्नईयीनचे 18 सामन्यांतून 18 गुण आहेत. नॉर्थईस्ट युनायटेड संघ सलग सात सामने अपराजित आहे. त्यापैकी सहा सामने अंतरिम मुख्य प्रशिक्षक खालिद जमील यांच्या मार्गदर्शनाखालील आहेत.

ISL 2020-21स्पर्धेच्या इतिहासात गोव्यातील या प्रमुख मैदानावर होणार आयएसएलचा...

‘‘आमचे दोन सामने बाकी आहेत आणि आम्ही चांगल्या निकालासाठी खेळू. दोन्ही सामन्यात आम्ही जिंकण्यासाठी पूर्ण क्षमतेने खेळ करू,’’ असे चेन्नईयीनचे प्रशिक्षक साबा लाझ्लो यांनी बुधवारी सांगितले.

दृष्टिक्षेपात...

- नॉर्थईस्ट युनायटेडची कामगिरी ः 17 सामने, 6 विजय, 8 बरोबरी, 3 पराभव

- चेन्नईयीनची कामगिरी ः 18 सामने, 3 विजय, 9 बरोबरी, 6 पराभव

- नॉर्थईस्टचे 24, तर चेन्नईयीनचे 13 गोल

- नॉर्थईस्टचे सलग 7 सामन्यांत 4 विजय, 3 बरोबरी 

- चेन्नईयीन सलग 7 सामने विजयाविना, 4 बरोबरी, 3 पराभव

- चेन्नईयीनच्या 6, तर नॉर्थईस्टच्या 4 क्लीन शीट्स

- पहिल्या टप्प्यात वास्को येथे उभय संघांत 0-0 बरोबरी
 

संबंधित बातम्या