'चेन्नईने धोनीला संघात कायम ठेवू नये'

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 18 नोव्हेंबर 2020

धोनीला रिलिज केल्यामुळे वाचणाऱ्या पैशातून इतर चांगले खेळाडू घेतले, तर ते तीन वर्षांसाठी तुमच्या संघात राहतील. 

 

नवी दिल्ली- पुढच्या आयपीएलसाठी जर सर्वांचा नव्याने लिलाव झाला, तर चेन्नई सुपर किंग्ज संघाने महेंद्रसिंग धोनीला आपल्या संघात कायम ठेऊ नये, हवे असेल तर राईट टू मॅच कार्डने त्याला पुन्हा संघात घ्यावे. असे केल्याने चेन्नई संघाचे १५ कोटी वाचतील आणि ही रक्कम इतर चांगले खेळाडू संघात घेण्यासाठी वापरावी, अशी सूचना माजी क्रिकेटपटू आणि सध्याचे समालोचक आकाश चोप्रा यांनी केली आहे.

धोनीला रिलिज केल्यामुळे वाचणाऱ्या पैशातून इतर चांगले खेळाडू घेतले, तर ते तीन वर्षांसाठी तुमच्या संघात राहतील. परंतु, धोनी तीन वर्षे आयपीएल खेळणार आहे का, असा प्रश्‍न उपस्थित करून चोप्रा म्हणतात, धोनीला संघात घेऊ नका, असे मी म्हणत नाही, राईट टू मॅच कार्डने त्याला संघात घेता येईल.

धोनी जर २०२१ चा मोसम खेळून निवृत्त झाला, तर २०२२ च्या मोसमासाठी तुम्हाला १५ कोटी मिळतील; पण १५ कोटी इतकी रक्कम खर्च करावी, असा खेळाडू मिळणार आहे का? त्यामुळे मेघा लिलावात चेन्नई संघाला एक वेगळा प्रयत्न करण्याची संधी असेल, असे चोप्रा यांनी म्हटले आ

संबंधित बातम्या