महेंद्र सिंग धोनीचा षटकार पाहून तुम्हीही म्हणाल, 109 मीटर की 114 मीटर? 

दैनिक गोमन्तक
रविवार, 21 मार्च 2021

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धेच्या यंदाच्या हंगामासाठी चेन्नई सुपर किंग्ज संघाने नुकतेच सरावाला सुरवात केली आहे. चेन्नईत संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी, सुरेश रैना आणि इतर काही खेळाडूंनीही सराव सुरू केला आहे.

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धेच्या यंदाच्या हंगामासाठी चेन्नई सुपर किंग्ज संघाने नुकतेच सरावाला सुरवात केली आहे. चेन्नईत संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी, सुरेश रैना आणि इतर काही खेळाडूंनीही सराव सुरू केला आहे. आयपीएल स्पर्धेची सुरवात 9 एप्रिलपासून होणार आहे. आणि एमएस धोनीने या मोसमासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. व चेन्नई सुपर किंग्ज संघाचा सामना 10 एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्स संघासोबत होणार आहे. कोरोनाच्या संकटामुळे मागील वर्षी आयपीएलचा तेरावा हंगाम संयुक्त अरब अमिरातीत खेळवण्यात आला होता. आणि या स्पर्धेत धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज संघाला प्लेऑफची फेरी देखील गाठता आली नव्हती. मात्र यंदाच्या हंगामात चेन्नईचा संघ आपल्या संपूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरणार असल्याचे दिसते. (Chennai skipper Mahendra Singh Dhoni has started preparations for this years IPL season)

सीएसके संघातील धोनी आणि रैना यांच्या व्यतिरिक्त अंबाती रायुडू, दवेन ब्राव्हो, ऋतुराज गायकवाड हे खेळाडू देखील यंदाच्या हंगामासाठी चेन्नईत प्रचंड मेहनत घेत आहेत. चेन्नई संघाचे खेळाडू आयपीएलच्या यंदाच्या हंगामाची तयारी कशी करत आहेत, हे चाहत्यांपर्यंत पोहचवण्यासाठी सीएसकेच्या फ्रँचायझीने सोशल मीडियावरील आपल्या इन्स्टाग्रामवर आणखी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओ मध्ये संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी सराव करताना दिसत आहे.

IPL2021: ‘बबल-टू-बबल’ ट्रान्सफरसाठी बीसीआयने दिली मान्यता

चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) संघाने अपलोड केलेल्या या व्हिडिओ मध्ये महेंद्रसिंग धोनी शानदार फटका खेळताना दिसत आहे. नेट प्रॅक्टिसच्या वेळेस धोनी एक उत्तुंग फटका मारताना दिसत असून, त्याने मारलेला चेंडू स्टेडियम मध्ये जाऊन पडल्याचे दिसते. तसेच चेंडू पडण्याचा जोरदार आवाज या व्हिडिओ मध्ये ऐकू येतो. चेन्नईने हा व्हिडिओ पोस्ट करत, 109 मीटर का 114 मीटर असे कॅप्शन दिले आहे. चेन्नई संघाने शेअर केलेला धोनीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 

दरम्यान, मागील वर्षाच्या स्वातंत्र्य दिनादिवशी भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीने (Mahendra Singh Dhoni) आतंरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती जाहीर केली होती. आणि त्यानंतर धोनी आयपीएलच्या तेराव्या हंगामातील स्पर्धेतच मैदानात खेळताना दिसला होता. मात्र या हंगामात धोनीच्या संघाला म्हणावी तशी कामगिरी करता आली नव्हती.   

संबंधित बातम्या