IPL 2023: धोनीच्या CSK चा सुपर 'विजय', दिल्ली कॅपिटल्स Play Off च्या शर्यतीतून बाद?

IPL 2023: आयपीएल 2023 मधील 55 वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला गेला.
CSK
CSKDainik Gomantak

IPL 2023: आयपीएल 2023 मधील 55 वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला गेला. सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना CSK ने 20 षटकात 8 गडी गमावून 167 धावा केल्या. मात्र, एकाही फलंदाजाला मोठी खेळी खेळता आली नाही.

धोनीने 9 चेंडूत 1 चौकार आणि 2 षटकार मारत 20 धावा केल्या. ऋतुराज गायकवाडने 24, डेव्हॉन कॉनवेने 10, अजिंक्य रहाणेने 21, शिवम दुबेने 25 आणि अंबाती रायडूने 23 धावा केल्या.

रवींद्र जडेजाने 21 धावांचे योगदान दिले. प्रत्युत्तरात दिल्लीचा संघ केवळ 140 धावाच करु शकला. शेवटी चेन्नईने या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा 27 धावांनी पराभव केला. या हंगामात सीएसकेचा हा 7वा विजय आहे.

दिल्ली कॅपिटल्सची फलंदाजी

दरम्यान, 168 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सची (Delhi Capitals) सुरुवात खराब झाली. चेन्नईकडून पहिल्याच षटकासाठी आलेल्या दीपक चहरने दुसऱ्याच चेंडूवर डेव्हिड वॉर्नरला अजिंक्य रहाणेकरवी झेलबाद केले.

वॉर्नरने दोन चेंडूंचा सामना केला, मात्र त्याला खातेही उघडता आले नाही. तर चहरने तिसऱ्या षटकात दिल्लीची दुसरी विकेट घेतली. 11 चेंडूत 17 धावा करणाऱ्या सॉल्टचा अंबाती रायुडूने कॅच घेतला.

CSK
IPL 2023: अंबाती रायडूने केला खास रेकॉर्ड, 'या' दिग्गजांच्या विशेष क्लबमध्ये झाला सामील!

पाथीरानाने शानदार गोलंदाजी केली

चौथ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर दिल्लीची तिसरी विकेट पडली. मिचेल मार्श 5 धावांवर धावबाद झाला. यानंतर मनीष पांडे आणि राईली रुसो यांच्यात चौथ्या विकेटसाठी 59 धावांची भागीदारी झाली.

मात्र, 13व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर पाथिरानाने ही भागीदारी मोडली. त्याने मनीष पांडेला एलबीडब्ल्यू आऊट केले.

पांड्याने 29 चेंडूत 27 धावा केल्या. तर पंधराव्या षटकात जडेजाने रुसोला पाथिरानाकरवी झेलबाद केले. रुसोने 37 चेंडूत 35 धावांची संथ खेळी खेळली.

CSK
IPL 2023: धोनीच्या 'या' व्हिडिओचा सोशल मीडियावर धूमाकूळ, दीपक चहरशी...; पाहा Video

अक्षरने 21 धावा केल्या

18व्या षटकात पाथीरानाने अक्षर पटेलला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्याने 12 चेंडूत 21 धावांची खेळी खेळली. रहाणेने अक्षरचा झेल घेतला. तर रिपल पटेल 19 व्या षटकातील 5 व्या चेंडूवर धावबाद झाला.

त्याने 16 चेंडूत 9 धावा केल्या. शेवटच्या षटकात पाथीरानाने ललित यादवला क्लीन बोल्ड केले. ललितने 5 चेंडूत 12 धावा केल्या. अमन खान 2 धावा करुन नाबाद राहिला. चेन्नईकडून पाथीरानाने 3 बळी घेतले. तर दीपक चहरने 2 आणि रवींद्र जडेजाने 1 बळी घेतला.

दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन

चेन्नई सुपर किंग्ज - ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad), डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, मोईन अली, अंबाती रायुडू, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कॅन्डर व विकेट), दीपक चहर, तुषार देशपांडे, महेश तिक्षणा.

दिल्ली कॅपिटल्स - डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), फिलिप सॉल्ट (यष्टीरक्षक), मिचेल मार्श, रिले रोसो, अक्षर पटेल, अमन हकीम खान, रिपल पटेल, ललित यादव, कुलदीप यादव, खलील अहमद, इशांत शर्मा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com