CSK ची टीम झाली रंगेबेरंगी, थालाचीही दिसली झलक; धुळवडीचा Video तुफान व्हायरल

चेन्नई सुपर किंग्स संघानेही होळीचे जोरदार सेलिब्रेशन केले असून, त्यांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
CSK Holi Celebration
CSK Holi CelebrationDainik Gomantak

Chennai Super Kings' Holi Celebration: मंगळवारी (7 मार्च) भारतभरात होळीचा उत्साह पाहायला मिळाला. संपूर्ण देशात रंगांची उधळण झाली होती. दरम्यान, अनेक क्रिकेटपटूंनीही होळी खेळतानाचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले. असाच होळीच्या रंगात न्हाऊन निघालेल्या आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्स संघाचा (CSK) व्हिडिओही सध्या व्हायरल होत आहे.

सीएसके संघाच्या सोशल मीडिया अकाउंटवर खेळाडूंनी होळी खेळतानाचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला 'आता झाली ना होळी सुरू, सर्वांना होळीच्या सुपर शुभेच्छा', असे कॅप्शन दिले आहे.

CSK Holi Celebration
IPL सुरु होण्यापूर्वीच CSK ला मोठा झटका, 'हा' सुपरस्टार संपूर्ण हंगाम खेळू शकणार नाही!

सध्या सीएसके संघातील अनेक खेळाडू आगामी आयपीएल हंगामाच्या तयारीसाठी चेन्नईला जमले आहेत. याचदरम्यान त्यांनी होळी खेळली. या व्हिडिओमध्ये दिसते तुषार देशपांडे होळी कधी आहे असे विचारत आहे. त्यानंतर सीएसकेचे खेळाडू होळी खेळताना दिसतात. हे खेळाडू एकमेकांवर रंग उधळत आहेत.

तसेच प्रशांत सोळंकीला ओढून आणत त्याच्यावर इतर खेळाडूंनी रंग टाकला आहे. या व्हिडिओमध्ये सीएसकेचा कर्णधार एमएस धोनीचीही झलक दिसली आहे. पण त्याचा चेहरा पूर्ण स्वच्छ दिसत आहे. तो या व्हिडिओमध्ये सर्वांना होळीच्या शुभेच्छा देताना दिसतोय. सीएसकेच्या या होळीच्या व्हिडिओला चाहत्यांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे.

दरम्यान, केवळ सीएसकेनेच नाही, तर सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटीपूर्वी भारतीय संघानेही होळीचा आनंद घेतला आहे. भारतीय संघातील खेळाडूंनीही होळीचे जोरदार सेलिब्रेशन केले आहे. त्यांचे फोटो आणि व्हिडिओही व्हायरल झाले आहेत.

CSK Holi Celebration
CSK साठी मोठी बातमी, 'हा' धाकड 2021 नंतर पहिल्यांदाच IPL मध्ये परतणार

सीएसकेची जोरदार तयारी

आयपीएलच्या 16 व्या हंगामाला 31 मार्चपासून सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी सीएसके संघाचे चेन्नईमध्ये सराव शिबिर सुरू झाले आहे. त्याचमुळे अनेक खेळाडू सध्या चेन्नईमध्ये आहेत. यामध्ये धोनीचाही समावेश आहे. या खेळाडूंनी आयपीएलची तयारी सुरू केली आहे. सीएसके यंदा पाचव्यांदा आयपीएल विजेतेपद जिंकण्याचा प्रयत्न करणार आहे.

यापूर्वी सीएसकेने चारवेळा आयपीएलची ट्रॉफी उंचावली आहे. दरम्यान, सध्या अशीही चर्चा आहे की हा आयपीएल हंगाम धोनीचा अखेरचा हंगाम असू शकतो. त्यामुळे असे असेल, तर सीएसकेचा संघ आपल्या कर्णधाराला विजेतेपदाची भेट देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसू शकतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com