IPL 2023: आयपीएलच्या इतिहासात 'या' अष्टपैलू खेळाडूने केली सर्वाधिक कमाई, त्याच्या आसपासही...

Most Earning All Rounder In IPL: आयपीएल ही एक प्रीमियर लीग आहे, जी जगातील सर्वात महागडी आणि सर्वात मोठी क्रिकेट लीग आहे.
Ravindra Jadeja
Ravindra JadejaDainik Gomantak

Most Earning All Rounder In IPL: आयपीएल ही एक प्रीमियर लीग आहे, जी जगातील सर्वात महागडी आणि सर्वात मोठी क्रिकेट लीग आहे. या लीगमध्ये संघ खेळाडूंवर पाण्यासारखा पैसे खर्च करतात.

यावेळीही, आयपीएलच्या मेगा लिलावात फ्रँचायझींनी अष्टपैलू खेळाडूंवर भरपूर पैसा खर्च केला आहे, पण तुम्हाला माहित आहे का की, आजपर्यंत कोणत्या अष्टपैलू खेळाडूने सर्वाधिक कमाई केली आहे. चला जाणून घेऊया...

या अष्टपैलू खेळाडूने सर्वाधिक कमाई केली आहे

आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक कमाई करणारा अष्टपैलू खेळाडू परदेशी नसून भारतीय खेळाडू आहे.

होय, आयपीएलच्या (IPL) इतिहासात आतापर्यंत सर्वाधिक कमाई करणारा अष्टपैलू खेळाडू चेन्नई सुपर किंग्जचा रवींद्र जडेजा आहे. जडेजाने एवढी कमाई केली आहे की, त्याच्या आसपास कोणीही नाही.

मनीबॉलच्या रिपोर्टनुसार, जडेजाने आयपीएलमध्ये आतापर्यंत 109 कोटींहून अधिक कमाई केली आहे. 100 कोटी कमावणारा जडेजा हा आयपीएलचा पहिला अष्टपैलू खेळाडू आहे.

Ravindra Jadeja
IPL 2023: वयाच्या 41 व्या वर्षी 'हा' धाकड करणार मोठा पराक्रम, गेल-डिव्हिलियर्सच्या खास क्लबमध्ये...!

टॉप-5 मध्ये 2 भारतीय अष्टपैलू खेळाडू

आयपीएलमधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या 5 अष्टपैलू खेळाडूंबद्दल बोलायचे झाल्यास, त्यात 2 भारतीय क्रिकेटपटूंचा समावेश आहे.

100 कोटींहून अधिक कमाईसह जडेजा पहिल्या क्रमांकावर आहे, तर आरसीबीचा ग्लेन मॅक्सवेल या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.

त्याने आतापर्यंत 85 कोटींची कमाई केली आहे, तर भारताचा अष्टपैलू खेळाडू रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) तिसऱ्या क्रमांकावर आहे. अश्विनने 82 कोटींची कमाई केली आहे.

चेन्नईचा स्टार खेळाडू बेन स्टोक्स 80 कोटींसह चौथ्या क्रमांकावर तर मुंबईचा केरॉन पोलार्ड पाचव्या क्रमांकावर आहे. त्याने 80 कोटींची कमाईही केली आहे. मात्र, पोलार्ड आता आयपीएलमध्ये खेळताना दिसणार नाही.

Ravindra Jadeja
IPL 2023: एमएस धोनीला मिळाली ही मॅच विनर 'त्रिमूर्ती', विरोधी संघांसाठी धोक्याची घंटा

जडेजाची आयपीएल कारकीर्द अशी राहिली आहे

जडेजाने आयपीएलमध्ये आतापर्यंत 210 सामने खेळले असून त्यात त्याने 2502 धावा केल्या आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या 62 धावा आहे, बॉलसह त्याने इतक्याच सामन्यांमध्ये 132 विकेट घेतल्या आहेत.

मात्र, जडेजाचा शेवटचा आयपीएल हंगाम खराब होता. त्याने 10 सामन्यांमध्ये 19 च्या अत्यंत खराब सरासरीने केवळ 116 धावा केल्या आणि तेवढ्याच सामन्यांमध्ये 5 विकेट घेतल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com