चेन्नईयीन एफसी संघात ताजिकिस्तानचा फुटबॉलपटू

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 17 ऑक्टोबर 2020

आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये त्याने ताजिकिस्तानचे ६८ सामन्यांत प्रतिनिधित्व केले आहे. या देशातर्फे सर्वाधिक सामने खेळणारा तो आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू आहे. चेन्नईयीन एफसी संघाशी करार करण्यापूर्वी त्याने ताजिकिस्तानमधील अव्वल श्रेणीतील एफके खुजांद संघाचे प्रतिनिधित्व केले होते.

पणजी- गोव्यात होणाऱ्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या सातव्या मोसमात ताजिकी फुटबॉलपटू खेळणार आहे. दोन वेळच्या विजेत्या चेन्नईयीन एफसी संघाने ताजिकिस्तानचा आंतरराष्ट्रीय विंगर फात्खुलो फात्खुलोएव याला २०२०-२१ मोसमासाठी करारबद्ध केले आहे.

संघात दोन्ही विंगमध्ये सहजतेने खेळू शकणारा फात्खुलो तीस वर्षांचा आहे. आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये त्याने ताजिकिस्तानचे ६८ सामन्यांत प्रतिनिधित्व केले आहे. या देशातर्फे सर्वाधिक सामने खेळणारा तो आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू आहे. चेन्नईयीन एफसी संघाशी करार करण्यापूर्वी त्याने ताजिकिस्तानमधील अव्वल श्रेणीतील एफके खुजांद संघाचे प्रतिनिधित्व केले होते. चेन्नईयीन एफसी संघाने फात्खुलो याच्याशी करार करून आयएसएल मार्गदर्शक तत्त्वानुसार आशियाई खेळाडूचा कोटा पूर्ण केला आहे.

फात्खुलोएव हा ताजिकिस्तानमधील दुशांबे शहरातील रहिवासी आहे. फात्खुलोच्या रुपात संघाला अनुभवी व्यावसायिक फुटबॉलपटू गवसल्याचे मत चेन्नईयीन एफसीचे प्रशिक्षक साबा लाझ्लो यांनी व्यक्त केले आहे. 

फात्खुलो ताजिकिस्तानच्या वयोगट संघातूनही खेळला आहे. २००६ साली ताजिकिस्तानने १७ वर्षांखालील आशियाई फुटबॉल स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळविला होता. त्यावेळ या क्रमाकांच्या लढतीत सीरियाविरुद्ध फात्खुलो याने निर्णायक गोल नोंदविला होता. त्याचवर्षी ताजिकिस्तानने १७ वर्षांखालील विश्वकरंडक स्पर्धेत १६ संघांची फेरी गाठली होती. त्यावेळी साखळी फेरीत फात्खुलो याने अमेरिकेविरुद्ध महत्त्वपूर्ण गोल केला होता.  सीनियर आंतरराष्ट्रीय पातळीवर फात्खुलो याने ६८ लढतीत नऊ गोल केले आहेत. त्यापैकी दोन गोल त्याने भारताविरुद्ध अनुक्रमे २००८ मध्ये एएफसी चॅलेंज कप व २०१३ मधील आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण लढतीत नोंदविले होते.पणजी, ता. १६ (क्रीडा प्रतिनिधी) : गोव्यात होणाऱ्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या सातव्या मोसमात ताजिकी फुटबॉलपटू खेळणार आहे. दोन वेळच्या विजेत्या चेन्नईयीन एफसी संघाने ताजिकिस्तानचा आंतरराष्ट्रीय विंगर फात्खुलो फात्खुलोएव याला २०२०-२१ मोसमासाठी करारबद्ध केले आहे.
संघात दोन्ही विंगमध्ये सहजतेने खेळू शकणारा फात्खुलो तीस वर्षांचा आहे. आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये त्याने ताजिकिस्तानचे ६८ सामन्यांत प्रतिनिधित्व केले आहे. या देशातर्फे सर्वाधिक सामने खेळणारा तो आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू आहे. चेन्नईयीन एफसी संघाशी करार करण्यापूर्वी त्याने ताजिकिस्तानमधील अव्वल श्रेणीतील एफके खुजांद संघाचे प्रतिनिधित्व केले होते. चेन्नईयीन एफसी संघाने फात्खुलो याच्याशी करार करून आयएसएल मार्गदर्शक तत्त्वानुसार आशियाई खेळाडूचा कोटा पूर्ण केला आहे.

फात्खुलोएव हा ताजिकिस्तानमधील दुशांबे शहरातील रहिवासी आहे. फात्खुलोच्या रुपात संघाला अनुभवी व्यावसायिक फुटबॉलपटू गवसल्याचे मत चेन्नईयीन एफसीचे प्रशिक्षक साबा लाझ्लो यांनी व्यक्त केले आहे. 

फात्खुलो ताजिकिस्तानच्या वयोगट संघातूनही खेळला आहे. २००६ साली ताजिकिस्तानने १७ वर्षांखालील आशियाई फुटबॉल स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळविला होता. त्यावेळ या क्रमाकांच्या लढतीत सीरियाविरुद्ध फात्खुलो याने निर्णायक गोल नोंदविला होता. त्याचवर्षी ताजिकिस्तानने १७ वर्षांखालील विश्वकरंडक स्पर्धेत १६ संघांची फेरी गाठली होती. त्यावेळी साखळी फेरीत फात्खुलो याने अमेरिकेविरुद्ध महत्त्वपूर्ण गोल केला होता.  सीनियर आंतरराष्ट्रीय पातळीवर फात्खुलो याने ६८ लढतीत नऊ गोल केले आहेत. त्यापैकी दोन गोल त्याने भारताविरुद्ध अनुक्रमे २००८ मध्ये एएफसी चॅलेंज कप व २०१३ मधील आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण लढतीत नोंदविले होते.

संबंधित बातम्या