बुद्धिबळपटू भक्तीला प्रतीक्षा सरकारच्या प्रोत्साहनाची

तमिळनाडूतील बुद्धिबळपटूंवर धनवर्षाव : गोवा सरकारकडून मात्र दुर्लक्ष
बुद्धिबळपटू भक्तीला प्रतीक्षा सरकारच्या प्रोत्साहनाची
Chess player Bhakti Kulkarni Waiting for goa government encouragementDainik Gomantak

पणजी: भारताने गतवर्षी ऑनलाईन ऑलिंपियाड स्पर्धेत संयुक्त विजेतेपद मिळविले, तर यंदा ब्राँझपदक जिंकले. या कामगिरीची दखल घेत तमिळनाडू सरकारने राष्ट्रीय संघातील आपल्या खेळाडूंसाठी एकत्रित एक कोटी 98.5 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. मात्र दोन्ही वेळेस भारताच्या ऑलिंपियाड संघातून खेळलेली, तसेच जागतिक पातळीवर चार प्रमुख पदके जिंकूनही गोवा सरकारने (Goa Govenment) इंटरनॅशनल मास्टर भक्ती कुलकर्णीच्या (Chess player Bhakti Kulkarni) कामगिरीची अजून दखल घेतलेली नाही.

प्राप्त वृत्तानुसार, 2020 मधील ऑलिंपियाड संयुक्त विजेत्या भारतीय संघात तमिळनाडूच्या विश्वनाथन आनंद, अरविंद चितंबरम, आर. वैशाली व प्रग्नानंद या खेळाडूंचा समावेश होता. त्यांना तमिळनाडू सरकारकडून प्रत्येकी 20 लाख रुपये बक्षीस मिळणार आहे. यंदा ब्राँझपदक जिंकलेल्या भारतीय संघात विश्वनाथन आनंद, अधिबन, प्रग्नानंद, वैशाली व सविताश्री या तमिळनाडूतील खेळाडूंना राज्य सरकारकडून प्रत्येकी दहा लाख रुपये बक्षीस मिळेल. याशिवाय दोन्ही वेळेस संघाचे प्रशिक्षक असलेले श्रीनाथ यांना 16.5 लाख रुपये, तर महिला संघाचे प्रशिक्षक श्याम यांना तीन लाख रुपये मिळतील. 2019 साली जागतिक सांघिक बुद्धिबळ स्पर्धेत बोर्ड 1 सुवर्णपदक जिंकलेल्या अधिबन याला वीस लाख रूपयांचे बक्षीस मिळेल.

Chess player Bhakti Kulkarni Waiting for goa government encouragement
गोव्याची भक्ती ‘अर्जुन’ पुरस्काराची दावेदार

भक्ती कौतुकापासून दूर

तमिळनाडू सरकार आपल्या राज्यातील बुद्धिबळपटूंवर धनवर्षाव करत असताना, वर्षभरात चार प्रमुख जागतिक स्पर्धांत पदके जिंकूनही गोवा सरकारकडून भक्ती कुलकर्णीच्या कामगिरीची दखल घेऊन तिला रोख बक्षीस अजून जाहीर करण्यात आलेले नाही. भक्तीने गतवर्षी ऑलिंपियाड स्पर्धेत सुवर्ण, यंदा ऑलिंपियाडमध्ये ब्राँझ, गतवर्षी आशिया महिला स्पर्धेत सांघिक सुवर्ण, यंदा स्पेनमध्ये जागतिक महिला सांघिक स्पर्धेत ऐतिहासिक रौप्यपदक जिंकले आहे. राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर गोवा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष आहेत, तर वीजमंत्री नीलेश काब्राल संघटनेचे माजी अध्यक्ष आहेत.

Chess player Bhakti Kulkarni Waiting for goa government encouragement
बुध्दिबळपटू भक्ती कुलकर्णीची विजयी सलामी

‘‘भक्तीच्या जागतिक पातळीवरील स्पृहणीय कामगिरीची गोवा सरकार नक्कीच दखल घेईल याचा मला विश्वास आहे. तमिळनाडू सरकारने आपल्या खेळाडूंना रोख रकमेचे बक्षीस जाहीर करून चांगला पायंडा पाडला आहे. आता इतर राज्यांकडूनही असेच प्रोत्साहन मिळाल्यास खेळाडूंचा हुरूप वाढेल.’’

- रघुनंदन गोखले, द्रोणाचार्य पुरस्कारप्राप्त बुद्धिबळ प्रशिक्षक

Related Stories

No stories found.