Chhattisgarh VS Goa:'हरप्रीतसिंग'च्या भेदक माऱ्यासमोर गोव्याचे लोटांगण

एकदिवसीय क्रिकेट सामन्यात छत्तीसगडचा 41 धावांनी विजय
Chhattisgarh VS Goa
Chhattisgarh VS GoaDainik Gomantak

पणजी: अवघा दुसराच लिस्ट ए सामना खेळणारा वेगवान गोलंदाज ऋत्विक नाईक याने छत्तीसगडला चार धक्के दिले. त्यामुळे विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट सामन्यात त्यांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. मात्र गोव्याच्या फलंदाजांनी साफ निराशा केल्याने प्रतिस्पर्ध्यांना सामना 41 धावांनी जिंकता आला.

(Chhattisgarh defeated Goa in the Vijay Hazare Trophy ODI cricket match )

सामना सोमवारी बंगळूर येथील जस्ट क्रिकेट मैदानावर झाला. छत्तीसगडने प्रथम फलंदाजी करताना 8 बाद 226 धावा केल्या. ऋत्विकच्या भेदकसमोर त्यांची एकवेळ 5 बाद 81 अशी स्थिती झाली होती.

कर्णधार हरप्रीतसिंग भाटिया (77) याने शुभम अग्रवाल (नाबाद 63) याच्या समवेत सहाव्या विकेटसाठी 100 धावांची भागीदारी केली, त्यामुळे छत्तीसगडी सव्वादोनशे धावा करणे शक्य झाले. सानिध्य हुरकत (29) व अखिल हेरवाडकर (23) यांनी छत्तीसगडला 53 धावांची सलामी दिली. 21 वर्षीय ऋत्विकने सानिध्यला पायचीत बाद केल्यानंतर छत्तीसगडचा डाव संकटात सापडला.

गोव्याचा हा स्पर्धेतील तिसरा पराभव ठरला. त्यामुळे त्यांचे 10 गुण कायम राहिले. ‘क’ गटातील शेवटच्या लढतीत गोवा बुधवारी (ता. 23) हरियानाविरुद्ध खेळेल. छत्तीसगडने दुसऱ्या विजयाची नोंद करत गुणसंख्या 10 केली.

ईशानची एकहाती लढत

गोव्याच्या फलंदाजांना 227 धावांचे माफक आव्हान अजिबात पेलले नाही. अपवाद फक्त सलामीचा ईशान गडेकर ठरला. या डावखुऱ्या फलंदाजाने यावेळच्या स्पर्धेतील दुसरे अर्धशतक नोंदविताना 87 चेंडूंत 10 चौकार व एका षटकाराच्या मदतीने 67 धावा केल्या. दुसऱ्या टोकाला त्याला समर्थ साथ मिळाली नाही, त्यामुळे गोव्याचा डाव 47 षटकांत 185 धावांत संपुष्टात आला. जम बसवू पाहणारा सिद्धेश लाड धावबाद झाल्यानेही गोव्याचे नुकसान झाले.

Chhattisgarh VS Goa
katya Coelho won Gold Medal: राष्ट्रीय सेलिंग स्पर्धेत 'गोव्या'ला सुवर्ण पदक

पाच गडी टिपूनही अमूल्यला वगळले

गोव्याचा डावखुरा फिरकी गोलंदाज अमूल्य पांड्रेकर याने अरुणाचल प्रदेशविरुद्ध मागील लढतीत शानदार गोलंदाजी करताना 41 धावांत 5 गडी बाद केले होते. छत्तीसगडविरुद्धच्या लढतीसाठी अनुभवी दर्शन मिसाळ तंदुरुस्त ठरल्याने अमूल्यला वगळण्यात आले. छत्तीसगडविरुद्ध गोव्याच्या फिरकी गोलंदाजांना एकही गडी बाद करता आला नाही.

Chhattisgarh VS Goa
T20 World Cup 2024 साठी ICC ने घेतला मोठा निर्णय, संघांमध्ये केला हा बदल

संक्षिप्त धावफलक

छत्तीसगड : 50 षटकांत 8 बाद 226 ( सानिध्य हुरकत 29, अखिल हेरवाडकर 23, हरप्रीतसिंग भाटिया 77, अमनदीप खरे 15, शुभम अग्रवाल नाबाद 63, अर्जुन तेंडुलकर 10-1-44-2, लक्षय गर्ग 10-0-65-2, ऋत्विक नाईक 10-2-29-4, दर्शन मिसाळ 10-0-46-0, सुयश प्रभुदेसाई 2-0-11-0, मोहित रेडकर 8-0-30-0)

वि. वि. गोवा : 47 षटकांत सर्वबाद 185 (स्नेहल कवठणकर 8, ईशान गडेकर 67, एकनाथ केरकर 6, सिद्धेश लाड 15, सुयश प्रभुदेसाई 8, दीपराज गावकर 6, दर्शन मिसाळ 28, मोहित रेडकर 9, लक्षय गर्ग 9, अर्जुन तेंडुलकर नाबाद 9, ऋत्विक नाईक 8, सौरभ मजुमदार 2-29, सुमीत रुईकर 3-37, शुभम अग्रवाल 2-34).

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com