U-25 CK Nayudu Trophy: छत्तीसगडच्या संजीतचे सलग चौथे शतक; गोव्यावर 129 धावांची मोठी आघाडी

पर्वरी येथील जीसीए अकादमी मैदानावर सामना सुरु आहे
Sanjit Desai
Sanjit DesaiDainik Gomantak

U-25 CK Nayudu Trophy: मध्यफळीतील शैलीदार फलंदाज संजीत देसाई याने यावेळच्या कर्नल सी. के. नायडू करंडक 25 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेतील सलग चौथ्या सामन्यात शतक ठोकले. त्याच्या नाबाद 119 धावांच्या बळावर छत्तीसगडने सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर गोव्यावर 129 धावांची मोठी आघाडी प्राप्त केली.

Sanjit Desai
Mahadayi Water Dispute: बोम्मईंचा आडमुठेपणा, म्हणाले म्हादईचा प्रकल्प सुरू करणारच, गोव्याचा आम्हाला फरक पडत नाही

सामना पर्वरी येथील जीसीए अकादमी मैदानावर सुरू आहे. गोव्याच्या पहिल्या डावातील 207 धावांना उत्तर देताना छत्तीसगडने सोमवारी दुसऱ्या दिवशी खेळ थांबला तेव्हा 7 बाद 336 धावा केल्या होत्या. संजीतने नाबाद खेळीत 224 चेंडूंचा सामना करताना नऊ चौकार व तीन षटकार मारले.

त्याला कर्णधार गगनदीप सिंग याने समर्थ साथ दिली. या जोडीने पाचव्या विकेटसाठी 153 धावांची भागीदारी केली. त्यामुळे त्यांना 4 बाद 128 वरून दमदार धावसंख्येकडे कूच करता आली. डावखुऱ्या गगनदीपने 76 धावांची खेळी करताना 127 चेंडूंचा सामना केला व 10 चौकार मारले. त्यापूर्वी, छत्तीसगडचा सलामीचा फलंदाज सानिध्य हुरकत याने अर्धशतकी (67, 138 चेंडू, 10 चौकार, 1 षटकार) खेळी केली होती.

Sanjit Desai
Panjim Smart City : स्मार्ट शहरे लोकांचे जीवनमान उंचावण्याची सर्वात मोठी संधी : मुख्यमंत्री डॉ. सावंत

फलंदाजीत अफलातून सातत्य

संजीत 25 वर्षीय असून कर्नल सी. के. नायडू करंडक स्पर्धेतील त्याचा अखेरचा मोसम आहे. छत्तीसगडतर्फे तो 2018-19 मोसमात पाच रणजी सामने खेळला, पण एका अर्धशतकाव्यतिरिक्त मोठी धावसंख्या रचू शकला नाही.2021-22 मोसमात त्याने विजय हजारे करंडक एकदिवसीय स्पर्धेत चंडीगडविरुद्ध शतक नोंदविले होते.

छत्तीसगडच्या रणजी क्रिकेट संघातील स्थान गमावलेल्या संजीतने सीनियर संघाचे दार ठोठावण्याची संधी साधली. गोव्याविरुद्ध सामन्यापूर्वी त्याने तीन सामन्यांतील चार डावात तीन शतकांसह 428 धावा केल्या होत्या. सोमवारी त्याने त्यात आणखी एका शतकाची भर टाकून या स्पर्धेत सलग चार शतके ठोकण्याचा पराक्रम साधला.

Sanjit Desai
IIT Goa : दक्षिण गोव्यातच होणार IIT प्रकल्प, मुख्यमंत्र्यांचा पुनरुच्चार

गोव्याची गोलंदाजी दुबळी

डावखुरा फिरकी गोलंदाज कीथ पिंटो याचा अपवाद वगळता गोव्याची गोलंदाजी दुबळी ठरली. फिरकी गोलंदाज रोहन बोगाटी याला क्षेत्ररक्षण करताना हाताला दुखापत झाली व त्यावर टाके घालावे लागले, त्यामुळे गोव्याच्या गोलंदाजीवर मर्यादा आल्या.

कीथने चार गडी टिपताना सुरेख मारा केला, त्यामुळे छत्तीसगडला धक्के सहन करावे लागले. दीडशतकी भागीदारी संपुष्टात आणताना त्याने गगनदीप याला स्वतःच्याच गोलंदाजीवर झेलबाद केले. आक्रमक शैलीच्या सानिध्य हुरकत याला योगेश कवठणकरने बाद केले.

Sanjit Desai
Pariksha Pe Charcha 2023: परीक्षेला उत्सव समजून सामाेरे जा! मुख्यमंत्र्यांचा विद्यार्थांना सल्ला

संक्षिप्त धावफलक

गोवा, पहिला डाव : सर्वबाद 207.

छत्तीसगड, पहिला डाव (1 बाद 45 वरून) : 107 षटकांत 7 बाद 336 (सानिध्य हुरकत 67, प्रतीक यादव 17, हर्ष शर्मा 16, संजीत देसाई नाबाद 119, गगनदीप सिंग 76, हर्ष साहू 4, उत्कर्ष तिवारी 9, दीपक सिंग नाबाद 9, शुभम तारी 22-1-80-1, हेरंब परब 21-3-55-0, कीथ पिंटो 35-९-85-4, रोहन बोगाटी 2-0-7-0, योगेश कवठणकर 8-1-28-1, दीप कसवणकर 8-0-45-1, कौशल हट्टंगडी 1-0-5-0, यश पोरोब 10-0-23-0).

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com