ISL Football: केरळा ब्लास्टर्सविरुद्धचा पराभव गोवा संघाच्या चुका दाखवून देणारा

कार्लोस पेनया: पुनरावृत्ती टाळत पुढील सामन्याची तयारी
carlos pena
carlos penaDainik Gomantak

ISL Football: केरळा ब्लास्टर्सविरुद्ध एफसी गोवा संघाने चुका केल्या, त्यामुळे पराभव झाल्याची कबुली संघाचे मुख्य प्रशिक्षक कार्लोस पेनया यांनी दिली. त्याचवेळी त्रुटींची पुनरावृत्ती टाळत पुढील सामन्याची तयारी करण्याची ग्वाही स्पॅनिश मार्गदर्शकाने दिली.

carlos pena
Cooch Behar Trophy: फलंदाजी सुधारली, तरीही गोव्याचा पराभव

कोची येथे रविवारी रात्री केरळा ब्लास्टर्सने एफसी गोवावर 3-1 फरकाने मात केली. इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत सहा वर्षे आणि दहा सामन्यांनंतर केरळच्या संघाने गोव्यातील प्रतिस्पर्ध्यांवर मिळविलेला हा पहिलाच विजय ठरला. एफसी गोवाचा पुढील सामना घरच्या मैदानावर फातोर्ड्यात एटीके मोहन बागानविरुद्ध 20 रोजी होईल. पाच लढतीत तीन विजय व दोन पराभवासह एफसी गोवाचे सध्या नऊ गुण आहेत.

‘सपशेल माघार घेतली नाही’

एफसी गोवा संघ पराभूत झाला, तरीही शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही सपशेल माघार घेतली नाही. केरळाविरुद्ध लढतीतून खूप काही शिकता आले, असे 39 वर्षीय पेनया सामन्यानंतर म्हणाले. संघासाठी ही शिकण्याची प्रक्रिया आहे, असे सांगत झुंजार वृत्ती प्रदर्शित केलेल्या खेळाडूंचे त्यांनी कौतुकही केले.

‘‘पूर्वार्धाच्या अखेरस दोन गोलने मागे पडल्यानंतर संघ हतबल झाला नाही. तिसरा गोल स्वीकारल्यानंतरही आम्हाला उसळी घेण्याचा विश्वास वाटत होता. आम्ही मुसंडी मारली, पण ती पुरेशी ठरली नाही. शेवटच्या शिट्टीपर्यंत खेळाडू लढले आणि त्यांच्या या बाण्याने मी प्रभावित झालो आहे,’’ असे पेनया म्हणाले. ‘‘या सामन्यातून बोध घेण्याची आणि विश्लेषण करण्याची वेळ आहे. मला खात्री आहे, त्यातून आम्हाला खूप काही शिकता येईल,’’ एफसी गोवाचे मार्गदर्शक म्हणाले.

carlos pena
IPL 2023 मध्ये 'हा' स्टार खेळाडू खेळणार नाही, अचानक घेतला मोठा निर्णय !

बचावफळीस दुखापतींचा फटका

केरळा ब्लास्टर्सविरुद्धही एफसी गोवाच्या बचावफळीत बदल दिसले. या विभागातील खेळाडूंच्या दुखापतींमुळे पेनया यांची डोकेदुखी वाढली आहे. मार्क व्हालेंते आणि फारेस अरनौट हे दोघेही परदेशी बचावपटू पूर्ण तंदुरुस्त नाहीत. जमशेदपूरविरुद्ध बचावफळीत चमकलेला ग्‍लॅन मार्टिन्स केरळा ब्लास्टर्सविरुद्ध दुखापतीमुळे अनुपलब्ध ठरला. सावियर गामा कोचीतील सामन्यात बचावफळीत आला, पण मैदानावर तो वीस मिनिटेच टिकला. त्याची जागा सॅनसन परेराने घेतली. पुढील सामन्यापूर्वी सारे खेळाडू सज्ज होतील, अशी आशा पेनया यांनी व्यक्त केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com