
Swiss Open 2023: स्विस ओपन स्पर्धेत जगभरातील बॅडमिंटनपटू सध्या एकमेकांसमोर आहेत. या स्पर्धेतून रविवारी भारतासाठी एक मोठी बातमी समोर आली आहे.
भारताचे स्टार शटलर्स सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने या स्पर्धेची ट्रॉफी जिंकून इतिहास रचला आहे. हे विजेतेपद पटकावणारी सात्विक-चिराग जोडी ही पहिली भारतीय जोडी आहे.
भारताच्या सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने चीनच्या रेन झियांग यू आणि टॅन कियांग यांचा पराभव करुन स्विस ओपन सुपर 300 बॅडमिंटन (Badminton) पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावले.
जागतिक चॅम्पियनशिप 2022 कांस्यपदक विजेते, द्वितीय मानांकित, जागतिक क्रमवारीत 21 व्या स्थानावर असलेल्या जोडीचा 54 मिनिटांत 21-19, 24-22 असा पराभव केला.
भारताचे हे मोसमातील पहिले विजेतेपद आहे. गेल्या आठवड्यातच सात्विक आणि चिराग ही जोडी ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या फेरीतून बाहेर पडली होती.
गेल्या वर्षी इंडिया ओपन आणि फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या भारतीय जोडीसाठी हे पाचवे वर्ल्ड टूर विजेतेपद होते.
यापूर्वी, 2019 मध्ये थायलंड ओपन आणि 2018 मध्ये हैदराबाद ओपन जिंकले होते. सात्विक आणि चिराग यांनी 2022 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते.
पहिल्या गेमच्या मध्यांतराने 11-8 अशी आघाडी घेतल्याने भारतीयांनी अंतिम फेरीत चांगली सुरुवात केली. पण चीनच्या (China) जोडीने 12-17 ते 17-19 असे जबरदस्त पुनरागमन केले.
मात्र, सात्विक-चिराग जोडीने पहिला सेट 21-19 असा जिंकला. दोन्ही जोडीने दुसऱ्या गेमला चांगली सुरुवात केली पण मध्यंतराला पुन्हा एकदा भारतीय स्टार्संनी 11-9 अशी आघाडी घेतली.
मात्र, चीनी खेळाडूंनी सहजासहजी हार मानली नाही. शेवटपर्यंत दोन्ही जोडींमध्ये प्रत्येकी एका गुणासाठी लढत होती. पण अखेरीस सात्विक-चिरागने गेम आणि सामना 24-22 असा जिंकला.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.