ख्रिस गेलने पंतप्रधान मोदींचे मानले आभार

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 19 मार्च 2021

ख्रिस गेलने एका व्हिडिओ संदेशाद्वारे भारत सरकारचे आभार मानले.

(Chris Gayle thanked Prime Minister Modi) जगभरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव चिंता वाढवत असताना भारताने देशातर्गंत लसीकरणाला सुरुवात केली. केंद्र सरकारने दुसऱ्या टप्प्यात जेष्ठ नागरिकांना मोफत कोरोनाची लस देण्यास सुरुवात केली आहे. तसेच केंद्र सरकारने शेजारील देशानांही कोरोना व्हॅक्सीन पाठवण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर वेस्ट इंडिजला भारत सरकारने कोरोना हॅक्सीन पाठवल्यामुळे क्रिकेट जगतातील विस्फोटक फलंदाज ख्रिस गेलने भारत सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनतेचे आभार मानले आहेत. (Chris Gayle thanked Prime Minister Modi)

ख्रिस गेलने एका व्हिडिओ संदेशाद्वारे भारत सरकारचे आभार मानले. जमैकामधील भारतीय दूतावासाने ख्रिस गेलचा 17 सेंकदाचा व्हिडिओ ट्विटरवरुन शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये गेल म्हणतो, ‘’कोरोना व्हॅक्सीन दान केल्याबद्दल मी भारत सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी, आणि भारताच्या जनतेचे आभार मानतो...लवकरच मी भारतात येईन... पुन्हा एखदा कोरोना व्हॅक्सीनसाठी खूप खूप धन्यवाद मानतो,’’ असं गेलने म्हटले आहे.(Chris Gayle thanked Prime Minister Modi)

IND vs ENG: टीम इंडिया विरुद्ध टी -20 सामन्यात थर्ड अंपायरने 'ते' 2...

ख्रिस गेलने गुरुवारी जमैकातील भारतीय उच्चायुक्त आर. मसाकुई यांची दूतावासामध्य़े जाऊन भेट घेतली. दरम्यान 8 मार्चला भारत सरकारने अ‍ॅस्ट्राझेनेका व्हॅक्सीनचे 50 हजार डोस पाठवले होते. त्यानंतर जमैकाच्या पंतप्रधानांनी भारत सरकारचे आभार मानले. कठीण काळामध्ये आवश्यक ते सहकार्य केल्याबद्दल भारताचे आभार. पंतप्रधानांच्या आभारानंतर विस्फोटक फंलदाज ख्रिस गेलने सुध्दा भारताचे आभार मानले आहेत. 

 

संबंधित बातम्या