Legends League मध्ये खेळणार ख्रिस गेल, 17 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर दरम्यान होणार लीग

Chris Gayle: वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेल लिजेंड्स लीगच्या सीझन 2 मध्ये खेळणार आहे.
Chris Gayle
Chris GayleDainik Gomantak

Legends League: वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेल लिजेंड्स लीगच्या सीझन 2 मध्ये खेळणार आहे. T20 चा मास्टर मानल्या जाणाऱ्या ख्रिस गेलच्या नावावर अनेक विक्रम आहेत. T20 मध्ये सर्वाधिक शतके, जलद शतक, सर्वाधिक चौकार, षटकार आणि 10000 हून अधिक धावा करण्याचा विक्रमही ख्रिस गेलच्या नावावर आहे. संपूर्ण कारकिर्दीत दोनदा 300 पेक्षा जास्त धावा करणारा तो चौथा खेळाडू आहे.

दरम्यान, लिजेंड्स लीगमध्ये सहभागी होण्याची पुष्टी करताना ख्रिस गेल (Chris Gayle) म्हणाला की, 'मला लिजेंड्स लीगमध्ये खेळण्याची संधी मिळत आहे, ही खूप आनंदाची बाब आहे. मी एका प्रतिष्ठीत लीगचा भाग होत आहे. विशेष म्हणजे, या लीगमध्ये इतर महान खेळाडूही सहभागी होत आहे. मी खूप उत्सुक आहे.'

Chris Gayle
Legends League Cricket 2022: युसूफ पठाण का म्हणाला- 'टाइगर अभी जिंदा है बेटा'

दुसरीकडे, लिजेंड्स लीग क्रिकेटचे सीईओ रमण रहेजा म्हणाले की, 'आज ख्रिस गेलच्या येण्याने लीजेंड्स लीग मोठी झाली आहे. प्रसिद्ध माजी क्रिकेटपटूंसोबत यंदाचा हंगाम चांगलाच गाजणार आहे.'

सौरव गांगुली देखील सहभागी होणार

बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनीही या लीगमध्ये खेळण्यास होकार दिल्याचे अलीकडेच समोर आले आहे. गांगुलींचा पुन्हा मैदानावर जलवा पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. रमण रहेजा यांनी सौरव गांगुलीचे आभार मानले. रहेजा पुढे म्हणाले, 'गांगुली नेहमीच एक दिग्गज राहिला आहे. गांगुली विशेष सामना खेळणार आहे.'

Chris Gayle
Legends Cricket League: विरेंद्र सेहवागची भारतीय महाराज संघाच्या कर्णधारपदी निवड

ही लीग 17 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबरपर्यंत चालणार

17 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर दरम्यान भारतात (India) लीग ऑफ लिजेंड्स होणार आहेत. लीगमध्ये 4 संघ खेळणार आहेत. अनेक माजी क्रिकेटपटूंनी खेळण्याची पुष्टी केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com