IPL2021 : मायकल जॅक्सनच्या गाण्यावर ख्रिस गेलचा अफलातून डान्स; पहा व्हिडिओ 

दैनिक गोमन्तक
बुधवार, 7 एप्रिल 2021

लोकप्रिय इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) स्पर्धा येत्या शुक्रवारपासून खेळवण्यात येणार आहे.

लोकप्रिय इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) स्पर्धा येत्या शुक्रवारपासून खेळवण्यात येणार आहे. यंदा आयपीएल स्पर्धेचा चौदावा हंगाम आहे. त्यामुळे या स्पर्धेतील सर्व संघ मैदानावर उतरण्यासाठी सज्ज झाले आहेत. मात्र त्यापूर्वी कोरोनाच्या खबरदारीसाठी म्हणून सर्व संघाच्या खेळाडूंनी क्वारंटाईन पूर्ण केले आहे. पंजाब किंग्ज संघाचा दमदार फलंदाज ख्रिस गेलने देखील आपला क्वारंटाईन पूर्ण केला असून यानंतर झालेल्या आनंदात त्याने फलंदाजी प्रमाणेच डान्स केला आहे. यावेळेस त्याने ख्रिस गेलने पॉप सिंगर मायकल जॅक्सन प्रमाणे डान्स केल्याचे पहायला मिळाले आहे. (Chris Gayles amazing dance to Michael Jacksons song)   

जोफ्रा आर्चर तस्लिमा नसरीन यांच्यावर भडकला; जाणून घ्या प्रकरण

ख्रिस गेलने केलेल्या अफलातून डान्सचा व्हिडिओ पंजाब किंग्ज फ्रेंचायझीने सोशल मीडियाच्या ट्विटरवर शेअर केला आहे. आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत 41 वर्षीय ख्रिस गेल (Chris Gayle) मायकल जॅक्सनच्या लोकप्रिय 'स्मूथ क्रिमिनल' या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. याशिवाय ख्रिस गेलने डान्स करताना मूनवॉक देखील केल्याचे पाहायला मिळत आहे. या व्हिडिओ सोबत पंजाब किंग्ज फ्रेंचायझीने धमाकेदार कॅप्शन देखील पोस्ट मध्ये लिहिली आहे. पंजाब किंग्जने क्वारंटाइन होण्याचा खेळ संपला व तुमचा आवडता ख्रिस गेल बाहेर आला असल्याचे म्हटले आहे. 

दरम्यान, मागील वर्षी संयुक्त अरब अमिरातीत (UAE) पार पडलेल्या आयपीएल स्पर्धेच्या तेराव्या हंगामात ख्रिस गेल पहिल्या काही सामन्यांमध्ये मैदानात उतरू शकला नव्हता. मात्र त्यानंतर त्याने पुढील सर्व सामन्यांमध्ये खेळतानाच धमाकेदार कामगिरी केली होती. ख्रिस गेलच्या या खेळीमुळे पंजाबचा संघ सुरवातीला प्लेऑफ पर्यंत देखील पोहचू शकणार नसल्याचेच वाटत असताना पुन्हा संघ प्लेऑफ मध्ये जाईल असे सर्वांना वाटले होते. यावेळेस ख्रिस गेलने सात सामन्यांमध्ये 41.14 च्या सरासरीने 288 धावा केल्या होत्या. शिवाय यावेळी त्याचा स्ट्राइक रेट 137.14 होता.          

संबंधित बातम्या