ख्रिस गेलचे 'जमैका टू इंडिया' हे नवीन गाणे प्रदर्शित

ख्रिस गेलचे 'जमैका टू इंडिया' हे नवीन गाणे प्रदर्शित
chris gayle.

ख्रिस गेल ज्या पद्धतीने मैदानावर आपल्या बॅटने थैमान घालत असतो, त्याच पद्धतीने तो मैदानाबाहेरच्या विविध शैलीसाठीही तितकाच ओळखला जातो. सोशल मीडियावर गेल कधी नृत्य व्हिडिओ तर कधी मजेदार व्हिडिओंद्वारे चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असतो. आता ख्रिस गेलचे 'जमैका टू इंडिया' हे नवीन गाणे प्रदर्शित झाले आहे. त्याने हे गाणे रॅपर एमिवे बंटाय यांच्यासोबत बनवले आहे. ख्रिस गेलच्या या गाण्याला चाहत्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.(Chris Gayle's new song 'Jamaica to India' released)

'जमैका टू इंडिया' या गाण्यात ख्रिस गेल आणि एमिवे बंटाय यांची जुगलबंदी चांगलीच रंगताना दिसत आहे . गाण्यात इंग्रजी रॅप गेलने आणि हिंदी रॅप एमिवेने   म्हटले आहे. या दोघांनीही यात डान्स देखील केले आहे. या गाण्याचे बोल एमिवे व्यतिरिक्त ख्रिस गेलच्या टीमने लिहिले आहेत, तर संगीत टोनी जेम्स यांनी दिले आहे. ख्रिस गेलच्या या गाण्याचे चित्रीकरण एका रिच ठिकाणी करण्यात आले आहे. आयपीएलच्या प्रारंभानंतर हे गाणे लोकप्रिय होऊ लागले आहे.

एमिवेच्या यूट्यूब चॅनेलवर ख्रिस गेलचे 'जमैका तो इंडिया' हे गाणे प्रसिद्ध झाले आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ 13 लाखाहून अधिक लोकांनी पाहिला गेला आहे. ख्रिस गेलचे चाहते यावर भरपूर  प्रतिक्रिया देत आहेत. या अगोदर ख्रिस गेलची दोन हॉट गाणी रिलीस झाली होती. गेल सध्या इंडियन प्रीमियर लीगच्या निमित्ताने भारतात आहे आणि तो पंजाब किंग्स या संघाकडून खेळताना दिसणार आहे. गेलने या अगोदरच्या हंगामात 490 धाव केल्या होत्या. आता या हंगामात तो कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचे लक्ष आहे. 

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com