ईसीबीने नोकर कपात जाहीर केल्याने खेळाडूंच्या वेतन कपातची अपेक्षा: ख्रिस वॉक्स

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 17 सप्टेंबर 2020

कोरोना महामारीनंतर इंग्लंडमध्ये क्रिकेट मालिका सुरू झालेली असली तरी नुकसानीची किंमत मोठी आहे. परिणामी इंग्लंड क्रिकेट मंडळ खेळाडूंच्या मानधनातून २० टक्के कपात करण्याची शक्‍यता वेगवान गोलंदाज ख्रिस वोक्‍सने बोलून दाखवली.

लंडन: कोरोना महामारीनंतर इंग्लंडमध्ये क्रिकेट मालिका सुरू झालेली असली तरी नुकसानीची किंमत मोठी आहे. परिणामी इंग्लंड क्रिकेट मंडळ खेळाडूंच्या मानधनातून २० टक्के कपात करण्याची शक्‍यता वेगवान गोलंदाज ख्रिस वोक्‍सने बोलून दाखवली.

कोरोना महामारीचा उद्रेक झाल्याचा क्रिकेटवरही परिणाम झाला. इंग्लंड क्रिकेट मंडळाला १० कोटी पौंडचे नुकसान झालेले आहे. २०२१ पर्यंत सर्व काही सुरळीत झाले नाही, तर २० कोटी पौंडपर्यंत नुकसान होऊ शकते. ही संख्या फार मोठी असेल, असे वोक्‍स म्हणतो. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत मानधन कपात होणार हे जवळपास निश्‍चित आहे. नव्याने करार होण्याची वेळ आली आहे. त्यात काहीही होऊ शकतो, खेळाडू म्हणून वाट पाहाण्याशिवाय पर्याय नाही, असेही तो म्हणाला.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या