गोवा फुटबॉल असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी चर्चिल पुन्हा इच्छुक

फुटबॉल संघटनेची निवडणूक येत्या ऑक्टोबरमध्ये नियोजित, पाठिंब्याचा दावा
Churchill Alemao
Churchill AlemaoDainik Gomantak

पणजी : गोवा फुटबॉल असोसिएशनच्या (जीएफए) बहुतांश संलग्न क्लबचा आपल्याला पाठिंबा आहे, त्यामुळे पुन्हा एकदा संघटनेच्या अध्यक्षपदासाठी आपण इच्छुक असल्याचे माजी मुख्यमंत्री चर्चिल आलेमाव यांनी सांगितले. चार वर्षांपूर्वी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत माजी मंत्री आवेर्तान फुर्तादो यांचा पराभव करून ते जीएफए अध्यक्ष बनले होते.

Churchill Alemao
मला मुख्यमंत्री व्हायचं नाही मात्र... लोबोंच्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय?

या वर्षी ऑक्टोबरमध्ये जीएफए व्यवस्थापकीय समितीची निवडणूक नियोजित आहे. मागील निवडणुकीत 72 वर्षीय चर्चिल यांनी 100 मते प्राप्त करून विजय संपादन केला होता. चर्चिल ब्रदर्स फुटबॉल क्लबचे सर्वेसर्वा असलेले बाणावलीचे माजी आमदार प्रथमच जीएफए अध्यक्ष बनले होते. आता ते सलग दुसऱ्या टर्मसाठी प्रयत्नशील आहेत. कोविड-१९ महामारीमुळे मागील दोन वर्षांच्या कालावधीत अध्यक्ष या नात्याने फुटबॉलसाठी जास्त योगदान देता आले नाही याबद्दल चर्चिल यांनी खंत व्यक्त केली. जीएफए अध्यक्षपदी आपण अखेरच्या वेळेस आहे असे कधीच म्हटलेले नाही आणि राज्यातील फुटबॉल क्लबच्या आग्रहाखातीर पुन्हा अध्यक्ष होण्यास तयार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

Churchill Alemao
Video: राशिद खानने आपले स्वप्न चाहत्यांसोबत शेयर केले

चर्चिल व त्यांच्या कन्या वालंका यांनी तृणमूल काँग्रेस पक्षातर्फे फेब्रुवारीत झालेली राज्य विधानसभेची निवडणूक लढविली होती व दोघांनाही पराभव पत्करावा लागला. बाणावली मतदारसंघात चर्चिल यांना ‘आप’च्या (Aam Aadmi Party) व्हेन्झी व्हिएगस यांनी, तर नावेली मतदारसंघात वालंका यांना भाजपच्या उल्हास तुयेकर यांनी हरविले. विधानसभेच्या निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर आता चर्चिल फुटबॉलमध्ये पुन्हा सक्रिय झाले आहेत. वालंका या चर्चिल ब्रदर्स संघाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.

Churchill Alemao
गोव्याच्या तेजसला पाचव्या विजेतेपदाची संधी

चर्चिल यांच्याकडून मुख्यमंत्र्यांचे कौतुक

चर्चिल आलेमाव यांनी जीएफए व्यवस्थापकीय समिती बैठकीनंतर पत्रकारांसाठी बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी फुटबॉलला दिलेल्या पाठबळाबद्दल त्यांचे आभार मानले, तसेच त्यांचे कौतुकही केले. डॉ. सावंत यांनी राज्य सरकारतर्फे जीएफएला मागे एक कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता, त्यापैकी पन्नास लाख रुपये मिळाले आणि बाकी असलेले पन्नास लाख रुपये लवकरच मिळतील अशी आशा व्यक्त करून चर्चिल यांनी डॉ. सावंत पुन्हा मुख्यमंत्री बनल्याबद्दल आपणास आनंद झाल्याचे सांगितले.

प्रोफेशनल लीगला चर्चिल यांची मदत

पुरस्कर्त्याअभावी जीएफए प्रोफेशनल लीग फुटबॉल (Football) स्पर्धा आर्थिक विवंचनेत आहे. या स्पर्धेचा बाकी टप्पा पूर्ण करण्यासाठी आपण जीएफएला आर्थिक मदत करण्याचा ठरविल्याचे चर्चिल यांनी सांगितले. या स्पर्धेच्या पूर्ततेसाठी आपण जीएफएला सुमारे सात लाख रुपये देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले व स्पर्धा जीएफए प्रेझिटेंड ट्रॉफी या नावाने खेळली जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com