चर्चिल ब्रदर्सला ट्राऊ एफसी रोखले

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 30 जानेवारी 2021

माजी विजेत्या चर्चिल ब्रदर्सला आय-लीग फुटबॉल स्पर्धेत शुक्रवारी मणिपूरच्या टिड्डिम रोड एथलेटिक युनियन (ट्राऊ) संघाने 1-1 गोलबरोबरीत रोखले.

पणजी: माजी विजेत्या चर्चिल ब्रदर्सला आय-लीग फुटबॉल स्पर्धेत शुक्रवारी मणिपूरच्या टिड्डिम रोड एथलेटिक युनियन (ट्राऊ) संघाने 1-1 गोलबरोबरीत रोखले. सामना पश्चिम बंगालमधील कल्याणी येथील म्युनिसिपल स्टेडियमवर झाला.

सामन्याच्या 18व्या मिनिटास होंडुरासचा आघाडीपटू क्लेव्हिन झुनिगा याच्या गोलमुळे चर्चिल ब्रदर्सने आघाडी घेतली, त्याचा हा स्पर्धेतील पाचवा गोल ठरला. चर्चिल ब्रदर्सचा आघाडीचा आनंद जास्त काळ टिकला नाही. 23व्या मिनिटास 22 वर्षीय आघाडीपटू बिद्याशागर सिंग याच्या गोलमुळे ट्राऊ एफसीने बरोबरी साधली.

ईस्ट बंगालने पिछाडीवरून रोखले; बेदियास रेड कार्ड -

चर्चिल ब्रदर्स बरोबरीमुळे स्पर्धेत अपराजित आहे. त्यांची ही एकंदरीत दुसरी बरोबरी आहे. अन्य तीन विजयामुळे त्यांचे पाच सामन्यांतून 11 गुण झाले असून अग्रस्थान कायम आहे. ट्राऊ एफसीची ही चौथी बरोबरी ठरली. हा संघही अपराजित आहे. अन्य एका विजयामुळे पाच लढतीतून त्यांचे सात गुण झाले असून दुसरा क्रमांक मिळविला आहे.

गोव्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संबंधित बातम्या