Goa Professional League : चर्चिल ब्रदर्सच्या विजयात फ्रँकीचा धडाका

दैनिक गोमन्तक
सोमवार, 22 मार्च 2021

फ्रँकी ऑलिव्हेरा याने नोंदविलेल्या दोन गोलच्या बळावर चर्चिल ब्रदर्सने सोमवारी गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत विजयाची नोंद केली. त्यांनी कळंगुट असोसिएशनला 2 - 0 फरकाने हरविले.

पणजी : फ्रँकी ऑलिव्हेरा याने नोंदविलेल्या दोन गोलच्या बळावर चर्चिल ब्रदर्सने सोमवारी गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत विजयाची नोंद केली. त्यांनी कळंगुट असोसिएशनला 2 - 0 फरकाने हरविले.

गोंधळ निर्माण होत असल्याचे म्हणत 'डीआरएस'वरून विराट कोहली भडकला

म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर झालेल्या या लढतीत फ्रँकीने पहिला गोल 35व्या मिनिटास केला, नंतर त्याने दुसरा गोल 66व्या मिनिटास पेनल्टी फटक्यावर नोंदविला. चर्चिल ब्रदर्सचा हा आठ लढतीतील चौथा विजय ठरला. त्यांचे आता 12 गुण झाले आहेत. कळंगुट असोसिएशनला हा तिसरा पराभव ठरला, त्यामुळे सात लढतीनंतर त्यांचे 12 गुण कायम राहिले.

विराट-बटलर यांच्या वादावर इंग्लंडचा कर्णधार इऑन मॉर्गन  म्हणाला…

सुरवातीचे काही प्रयत्न व्यर्थ ठरल्यानंतर अर्ध्या तासाच्या खेळानंतर चर्चिल ब्रदर्सने आघाडी प्राप्त केली. कळंगुटच्या निक्सन कास्ताना चेंडूवर ताबा राखू शकला नाही, त्याचा लाभ उठवत अफदल वरिकोड्डन याने जॉस्टन बार्बोझा याला पास दिला. बार्बोझाने नंतर फ्रँकीला गोल करण्याची संधी उपलब्ध करून दिली. तासाभराच्या खेळानंतर कळंगुटच्या परमवीर सिंग याने चर्चिल ब्रदर्सच्या जॉस्टन बार्बोझास गोलक्षेत्रात पाडले, यावेळी मिळालेल्या पेनल्टी फटक्यावर फ्रँकीने संघाची आघाडी वाढविली. याशिवाय जॉस्टनने दोन वेळा सोपी संधी गमावली नसती, तर चर्चिल ब्रदर्सला आणखी मोठा विजय नोंदवता आला असता. 

संबंधित बातम्या