Football Tournament: 'चर्चिल ब्रदर्स'ला नमवत 'राजस्थान'ची विजयी दौड कायम

राजस्थान युनायटेड 2-1 फरकाने विजयी
SL football tournament
SL football tournamentDainik Gomantak

पणजी: आय-लीग फुटबॉल स्पर्धेचा सामना आज बांबोळी मैदानावर चर्चिल ब्रदर्स व राजस्थान युनायटेड यांच्यात खेळला गेला. या सामन्यातील शेवटची सहा मिनिटे, तसेच इंज्युरी टाईमची आठ मिनिटे राजस्थान युनायटेडला दहा खेळाडूंसह खेळावे लागले, पण त्यांनी 2-1 फरकाने मिळवलेली आघाडी निसटू दिली नाही आणि आय-लीग फुटबॉल स्पर्धेत दोन वेळच्या माजी विजेत्या चर्चिल ब्रदर्सला पराजित केले.

(Churchill Brothers beat Rajasthan United in the I-League Football Tournament)

दोन्ही संघांचा यंदाच्या स्पर्धेतील पहिलाच असलेला सामना मंगळवारी बांबोळी येथील अॅथलेटिक स्टेडियमवर झाला. सामन्याच्या पूर्वार्धात दोन्ही संघ 1-1 असे गोलबरोबरीत होते. गेल्या आठवड्यात ओडिशात झालेल्या बाजी रौत फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम लढतीत राजस्थान युनायटेडने चर्चिल ब्रदर्सला पेनल्टींवर हरविले होते. पाहुण्या संघाची विजयी मालिका बांबोळीतही कायम राहिली.

SL football tournament
Goa T20: ...तर गोव्यात आयपीएलच्या धर्तीवर व्हेटरन क्रिकेट

मेलरॉय मेल्विन अस्सिसी याने 29 व्या मिनिटास राजस्थान युनायटेडसाठी आघाडीचा गोल केला. 45+1व्या मिनिटास अब्दौलाये साने याच्या गोलमुळे चर्चिल ब्रदर्सला 1-1 अशी बरोबरी साधता आली. 75 व्या मिनिटास पी. एम. ब्रिटो याच्या गोलमुळे राजस्थान युनायटेडला पुन्हा आघाडी मिळाली.

84 व्या मिनिटास सामन्यात दुसऱ्यांदा ताकीद मिळाल्यामुळे हार्दिक भट याला रेड कार्डसह मैदान सोडावे लागले, त्यामुळे बाकीच्या कालावधीत राजस्थान युनायटेडला दहा खेळाडूंसह खेळावे लागले. मात्र त्यांनी आघाडी कायम राखण्यास यश मिळविले.

SL football tournament
Cricket Tournament:'केरळ'च्या विजयाने 'गोव्या'च्या मर्यादा उघड

चर्चिल ब्रदर्सचा पुढील सामना बांबोळी येथेच श्रीनिदी डेक्कन एफसीविरुद्ध 20 नोव्हेंबरला होईल. राजस्थान युनायटेड 19 नोव्हेंबरला रियल काश्मीरविरुद्ध खेळेल. स्पर्धेत मंगळवारी झालेल्या आणखी एका सामन्यात ऐजॉल येथे ऐजॉल एफसीने ट्राऊ एफसीला 1-1 असे गोलबरोबरीत रोखले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com