आय-लीगमध्ये धेंपो क्लबला चर्चिल ब्रदर्स गाठणार?

किशोर पेटकर
मंगळवार, 28 जुलै 2020

धेंपो क्लबच्या तीन विजेतेपदानंतर मोहन बागानचर्चिल ब्रदर्स व बंगळूर एफसी या संघांनी प्रत्येकी दोन वेळा आय-लीग स्पर्धा जिंकली आहे.

पणजी

आय-लीग फुटबॉल स्पर्धा सर्वाधिक तीन वेळा जिंकण्याचा पराक्रम गोव्याच्या धेंपो स्पोर्टस क्लबने बजावला आहे. गोव्याच्याच चर्चिल ब्रदर्सने आणखी एक विजेतेपद मिळविले नाहीतर गोल्डन ईगल्स संघाचा विक्रम काही काळ अबाधित राहील.

धेंपो क्लबच्या तीन विजेतेपदानंतर मोहन बागानचर्चिल ब्रदर्स व बंगळूर एफसी या संघांनी प्रत्येकी दोन वेळा आय-लीग स्पर्धा जिंकली आहे. बंगळूर एफसी संघ आता आयएसएल स्पर्धेत खेळतोतर गतमोसमात आय-लीग जिंकलेल्या कोलकात्यातील मोहन बागानचे आता आयएसएल विजेत्या एटीके संघात विलिनीकरण झाले असून यंदापासून संयुक्तपणे आयएसएल स्पर्धेत खेळतील. त्यामुळे दोन वेळा विजेतेपद मिळविलेल्या चर्चिल ब्रदर्सलाच आता आय-लीग विजेतेपदाच्या शर्यतीत धेंपो क्लबला गाठण्याची संधी आहे. धेंपो क्लब आता आय-लीग स्पर्धेत खेळत नाही.

कोरोना विषाणू महामारीच्या पार्श्वभूमीवर यंदाची आय-लीग फुटबॉल स्पर्धा एकाच केंद्रावर कोलकात्यात खेळविण्याबाबत अखिल भारतीय फुटबॉल महासंघ नियोजन करत आहे.

 मोहन बागानची धेंपोशी बरोबरी

कोलकात्याच्या मोहन बागानने गतमोसमात आय-लीग स्पर्धा जिंकून राष्ट्रीय विजेतेपदाचा मान पाचव्यांदा मिळविला आणि त्या प्रयत्नात धेंपो क्लबला गाठले. मोहन बागानने गतमोसमात चार फेऱ्या राखून स्पर्धा जिंकली. धेंपो स्पोर्टस क्लबने २००९-१० मोसमात चार फेऱ्या राखून आय-लीग स्पर्धा जिंकली होती. त्यांनी राष्ट्रीय साखळी फुटबॉल स्पर्धा २००४-०५ व २००६-०७ मोसमात जिंकली. गोव्याच्या संघाने आय-लीग स्पर्धेत २००७-०८२००९-१०२०११-१२ मोसमात विजेतेपद मिळविले. या कामगिरीला गाठताना मोहन बागानने यंदा पाचवे राष्ट्रीय विजेतेपद प्राप्त केले. कोलकात्याच्या संघाने राष्ट्रीय साखळी फुटबॉल स्पर्धेत १९९७-९८१९९९-२००० व २००१-०२ मोसमात बाजी मारली होती. आय-लीग स्पर्धेत त्यांनी सर्वप्रथम २०१४-१५ मोसमात विजेतेपद प्राप्त केले. त्यानंतर दुसऱ्यांदा २०१९-२० मोसमात विजेतेपदास गवसणी घातली.

 

आय-लीग विजेते

- धेंपो स्पोर्टस क्लब (३) : २००७-०८२००९-१०२०११-१२

- मोहन बागान (२) : २०१४-१५२०१९-२०

- चर्चिल ब्रदर्स (२) : २००८-०९२०१२-१३

- बंगळूर एफसी (२) : २०१३-१४२०१५-१६

- साळगावकर एफसी (२०१०-११)ऐजॉल एफसी (२०१६-१७)मिनर्व्हा पंजाब (२०१७-१८)चेन्नई सिटी (२०१८-१९)

 संपादन- अवित बगळे

संबंधित बातम्या