चर्चिल ब्रदर्सचे सेझावर वर्चस्व

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 8 मार्च 2021

विश्रांतीला पाच मिनिटे बाकी असताना ट्रिजॉय डायस याने नोंदविलेला गोल चर्चिल ब्रदर्ससाठी निर्णायक ठरला.

पणजी: गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत सोमवारी झालेल्या लढतीत चर्चिल ब्रदर्सने सेझा फुटबॉल अकादमीवर वर्चस्व राखताना पूर्ण तीन गुणाची कमाई केली. म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर झालेल्या सामन्यात गतवेळच्या संयुक्त विजेत्यांनी 1-0 फरकाने विजय प्राप्त केला. 

विश्रांतीला पाच मिनिटे बाकी असताना ट्रिजॉय डायस याने नोंदविलेला गोल चर्चिल ब्रदर्ससाठी निर्णायक ठरला. यग्य कपूर क्रॉस पासवर ट्रिजॉयचा हेडर भेदक ठरला. त्यापूर्वी दोन्ही संघाकडून गोल करण्याची संधी वाया गेली होती. 

ISL2020-21: गोवा आणि मुंबईसाठी अंतिमपूर्व `फायनल'

दोघांना रेड कार्ड

उत्तरार्धात सेझा अकादमीस बरोबरीची संधी होती, पण त्यांचा प्रयत्न फोल ठरला. सामन्यातील सहा मिनिटे बाकी असताना चर्चिल ब्रदर्स व सेझा अकादमीचे खेळाडू मैदानावरच एकमेकांना भिडल्यामुळे तणाव निर्माण झाला. त्यामुळे रेफरीने चर्चिल ब्रदर्सचा आसिफ व सेझाचा विष्णू गोसावी यांना थेट रेड कार्ड दाखविले. टॅकलनंतर आसिफ व विष्णू एकमेकांवर चालून गेले आणि धक्काबुक्की केली. 

संबंधित बातम्या