I-League Football : तणावग्रस्त सामन्यात चर्चिल ब्रदर्स विजयी

चर्चिल ब्रदर्स नेरोका एफसीला एका गोलने नमवून सहाव्या स्थानी
Churchill Brothers FC Goa Player
Churchill Brothers FC Goa PlayerDainik Gomantak

I-League Football : आय-लीग फुटबॉल स्पर्धेत शनिवारी चर्चिल ब्रदर्स व नेरोका एफसी यांच्यातील सामना तणावपूर्ण व वादग्रस्त ठरला. गोव्यातील संघाने 1-0 असा विजय नोंदवून गुणतक्त्यात सहावा क्रमांक मिळविला.

सामना संपत असताना दोन्ही संघांनी खेळाडू भिडले, त्यामुळे रेफरीने इंज्युरी टाईममध्ये चौघांना रेड कार्ड दाखविले. मणिपूरमधील इंफाळ येथील खुमान लाम्पाक स्टेडियमवर झालेल्या सामन्यात चर्चिल ब्रदर्सने 22व्या मिनिटास मोमो सिस्से याच्या पेनल्टी गोलमुळे आघाडी घेतली. मात्र हा गोल वादग्रस्त ठरला.

Churchill Brothers FC Goa Player
Bhakti Kulkarni : अर्जुन पुरस्कार विजेती भक्तीची पिल्सेन बुद्धिबळात अव्वल कामगिरी

नेरोका एफसीचा गोलरक्षक सोराम पोरेई याने डावीकडे झेपावत सिस्से याचा पेनल्टी फटका अडविला, पण गोलरक्षकाने अगोदरच आपली रेषा सोडल्यामुळे सहाय्यक रेफरीने पुन्हा पेनल्टी फटक्याची खूण केली. दुसऱ्या वेळेस सिस्से याने फटका मारताना चूक केली नाही.

सामन्याच्या इंज्युरी टाईममध्ये दोन्ही संघांतील खेळाडू मैदानावरच भिडले. त्यामुळे सामना संपत असताना रेफरीने नेरोका एफसीच्या नोंगाम्बा सिंग व डेव्हिड सिम्बो यांना, तर चर्चिल ब्रदर्सच्या शरीफ मुखाम्मद व पोनिफ वाझ यांना थेट रेड कार्ड दाखविले.

Churchill Brothers FC Goa Player
मंगळूरस्थित कोकणी कवी मेल्विन रोड्रिग्स यांची साहित्य अकादमीच्या निमंत्रकपदी निवड

सुपर कपमध्ये रियल काश्मीरशी गाठ

चर्चिल ब्रदर्सने शनिवारी नववा विजय नोंदविला. त्यांचे 22 लढतीनंतर 33 गुण झाले व त्यांना गुणतक्त्यात सहावा क्रमांक मिळाला. नेरोकाचे 11व्या पराभवामुळे 22 लढतीनंत 25 गुण झाले व त्यांना दहावा क्रमांक मिळाला.

आणखी एका सामन्यात रियल काश्मीरने राजस्थान युनायटेडला 1-0 असे हरवून 34 गुणांसह पाचवा क्रमांक प्राप्त केला. आगामी सुपर कप स्पर्धेत सहा एप्रिल रोजी आता रियल काश्मीर व चर्चिल ब्रदर्स यांच्यात कोझिकोड येथे पात्रता फेरीतील लढत होईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com