आय-लीग फुटबॉल : चर्चिल ब्रदर्सला मोहम्मेडनने रोखले

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 14 जानेवारी 2021

माजी विजेत्या चर्चिल ब्रदर्सला गुरुवारी आय-लीग फुटबॉल स्पर्धेत कोलकात्याच्या मोहम्मेडन स्पोर्टिंग क्लबने गोलशून्य बरोबरीत रोखले.

पणजी : माजी विजेत्या चर्चिल ब्रदर्सला गुरुवारी आय-लीग फुटबॉल स्पर्धेत कोलकात्याच्या मोहम्मेडन स्पोर्टिंग क्लबने गोलशून्य बरोबरीत रोखले. सामना पश्चिम बंगालमधील कल्याणी येथील म्युनिसिपल स्टेडियमवर झाला.

ISL : ओर्तिझच्या धडाक्यासह एफसी गोवाची प्रगती कायम 

बरोबरीमुळे दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण विभागून मिळाला. अगोदरच्या लढतीत इंडियन ॲरोजला नमविलेल्या चर्चिल ब्रदर्सचे आता दोन लढतीनंतर चार गुण झाले आहेत. एक विजय व एक बरोबरी यामुळे मोहम्मेडन स्पोर्टिंगचेही चार गुण झाले आहेत. चर्चिल ब्रदर्स आता पहिल्या, तर मोहम्मेडन स्पोर्टिंग दुसऱ्या क्रमांकावर आहे.

स्पर्धेतील अन्य लढतीत गोकुळम केरळा संघाने पंजाब एफसीवर 4 - 3 अशी, तर स्पर्धेत पदार्पण करणाऱ्या सुदेवा दिल्ली एफसी संघाने इंडियन ॲरोजवर 3 - 0 फरकाने विजय मिळविला. गोकुळम केरळा व सुदेवा दिल्ली यांचे प्रत्येकी तीन गुण झाले आहेत. पंजाब एफसीचे पराभवामुळे तीन गुण कायम राहिले, तर इंडियन ॲरोजला सलग दुसरा पराभव पत्करावा लागला.

संबंधित बातम्या