I-League : चर्चिल ब्रदर्ससमोर `नेरोका`चे आव्हान

दैनिक गोमन्तक
मंगळवार, 23 फेब्रुवारी 2021

गोव्याच्या चर्चिल ब्रदर्सने मणिपूरच्या नेरोका एफसी संघाला नमविल्यास त्यांना आय-लीग फुटबॉल स्पर्धेतील अग्रस्थान पुन्हा मिळविता येईल. उभय संघांतील सामना बुधवारी (ता. 24) कोलकाता येथे खेळला जाईल.

पणजी : गोव्याच्या चर्चिल ब्रदर्सने मणिपूरच्या नेरोका एफसी संघाला नमविल्यास त्यांना आय-लीग फुटबॉल स्पर्धेतील अग्रस्थान पुन्हा मिळविता येईल. उभय संघांतील सामना बुधवारी (ता. 24) कोलकाता येथे खेळला जाईल.

फर्नांडो व्हारेला यांच्या मार्गदर्शनाखालील चर्चिल ब्रदर्स संघ आठ सामने अपराजित आहे. चार विजय व चार बरोबरीमुळे त्यांच्या खाती 16 गुण आहेत. दुसरीकडे नेरोका एफसी संघ अकरा संघांत दहाव्या क्रमांकावर आहे. दोन विजय, दोन बरोबरी, चार पराभव या कामगिरीसह त्यांच्या खाती आठ लढतीनंतर फक्त आठ गुण आहेत. मंगळवारी रियल काश्मीरने ऐजॉल एफसीला 3-1 फरकाने हरवून स्पर्धेत 17 गुणांसह अव्वल स्थान मिळविले आहे.

INDvsENG : तिसऱ्या डे नाईट सामन्यात कोण ठरणार वरचढ? गौतम गंभीरनेच दिले याचे...

चर्चिल ब्रदर्सने सातव्या फेरीतील लढतीत चेन्नई सिटीला हरविले होते. नेरोका एफसीने स्पर्धेतील दुसऱ्या विजयाची नोंद करताना मागील लढतीत सुदेवा दिल्ली एफसीला पराजित केले. त्यामुळे चर्चिल ब्रदर्सला बुधवारी सावध राहावे लागेल. आक्रमणात त्यांची मदार होंडुरासचा क्लेव्हिन झुनिगा आणि स्लोव्हेनियाचा लुका मॅसेन यांच्यावर असेल. दोघांनीही स्पर्धेत प्रत्येकी पाच गोल केले आहेत.

 

दृष्टिक्षेपात...

- आय-लीगमध्ये एकमेकांविरुद्ध मागील 5 लढतीत नेरोका एफसीचे 3, चर्चिल ब्रदर्सचे 2 विजय

- गतमोसमात 2 फेब्रुवारी 2020 रोजी चर्चिल ब्रदर्सची नेरोकावर 4-1 फरकाने मात

- स्पर्धेत चर्चिल ब्रदर्सचे 11, तर नेरोका एफसीचे 13 गोल

संबंधित बातम्या