चर्चिल ब्रदर्सचा विलिस मोहम्मेडनशी करारबद्ध

किशोर पेटकर
गुरुवार, 16 जुलै 2020

आंतरराष्ट्रीय सामन्यांत प्रतिनिधीत्व केलेला विलिस ३२ वर्षाचा आहे.

पणजी 

 मागील दोन मोसम गोव्याच्या चर्चिल ब्रदर्स संघाकडून खेळलेला त्रिनिदाद-टोबॅगोचा आघाडीपटू विलिस प्लाझा पुन्हा कोलकात्यात फुटबॉल खेळणार आहे. मोहम्मेडन स्पोर्टिंगने त्याला आगामी मोसमासाठी बुधवारी करारबद्ध केले.

आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये त्रिनिदादचे २८ सामन्यांत प्रतिनिधित्व केलेला विलिस ३२ वर्षांचा आहे. मार्च २०१८ मध्ये तो चर्चिल ब्रदर्स संघात रुजू झाला. आय-लीग स्पर्धेच्या २०१८-१९ मोसमात त्याने २० सामन्यात २१ गोलतर २०१९-२० मोसमात १४ सामन्यात ८ गोल नोंदविले. या सेंटर-फॉरवर्ड खेळाडूने चर्चिल ब्रदर्सचे नेतृत्वही केले होतेपण गतमोसमात त्याला विशेष सूर गवसला नाही. आय-लीग स्पर्धेत चर्चिल ब्रदर्स संघाकडून खेळताना आय-लीग स्पर्धेत त्याने ३४ सामन्यांत २९ गोल आणि ४ असिस्ट अशी कामगिरी बजावली आहे.

चर्चिल ब्रदर्सशी करारबद्ध होण्यापूर्वी विलिस २०१७ मध्ये कोलकात्यातील ईस्ट बंगाल संघाकडूनतर २०१८ मध्ये मोहम्मेडन स्पोर्टिंग संघाकडून खेळला होता. आता तो पुन्हा कोलकात्यातील संघाकडून खेळताना दिसेल. आगामी मोसमात मोहम्मेडन स्पोर्टिंग क्लब कोलकाता फुटबॉल लीगमध्ये खेळेलतसेच पुन्हा आय-लीगमध्ये स्थान मिळविण्याच्या हेतूने पात्रता फेरी स्पर्धेतही भाग घेईल. मोहम्मेडन स्पोर्टिंगने यापूर्वीच नायजेरियन बचावपटू इझे किंग्सली याला करारबद्ध केले आहे.

संपादन- अवित बगळे

 

संबंधित बातम्या