मुख्यमंत्री चषक व्हॉलीबॉल स्पर्धेचा निकाल जाहीर

व्हॉलीबॉल स्पर्धेत पुरुष गटात पालयेच्या बाराजण स्पोर्ट्स क्लब तर महिला गटात ग्लीड ग्रुप हरमल संघ अंतिम विजेता ठरला
मुख्यमंत्री चषक व्हॉलीबॉल स्पर्धेचा निकाल जाहीर
CM Cup results of cup announce volleyball tournament Dainik Gomantak

भारतीय युवा मोर्चाच्या मांद्रे प्रभाग तर्फे आयोजित केलेल्या मुख्यमंत्री चषकाचे आयोजन केले होते. या व्हॉलीबॉल स्पर्धेत पुरुष गटात पालयेच्या बाराजण स्पोर्ट्स क्लब तर महिला गटात ग्लीड ग्रुप हरमल संघ अंतिम विजेता ठरला. पुरुष गटात टायटन मांद्रे तर महिला गटात व्हीन्टेज मांद्रे उपविजेता ठरला आहे.

CM Cup results of cup announce volleyball tournament
पॅरा टेबल टेनिस खेळाडू भाविनाला अर्जुन पुरस्कार

चोनसाई पार्से येथील मैदानावर विद्युत झोतात ही स्पर्धा भरवण्यात आली होती स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून मांद्रे मतदार संघाचे आमदार तथा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष दयानंद सोपटे उपस्थित होते याशिवाय व्यासपीठावर खास निमंत्रित पाहुणे म्हणून कोरगाव च्या श्री कमलेश्वर उच्च माध्यमिक विद्यालयाचे अध्यापक विठोबा बगळी , पार्सेच्या सरपंच सौ प्रगती सोपटे, भारतीय युवा मोर्चा मांद्रेचे अध्यक्ष रामा नाईक साई दीप सोपटे,सचिन गडेकर, परिस नाईक आदी उपस्थित होते.

CM Cup results of cup announce volleyball tournament
पेडणे तालुक्यात होणार आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान

मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी स्पर्धेच्या अंतिम सामन्याला आमदार तथा पर्यटन महामंडळाचे अध्यक्ष दयानंद सोपटे तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. भारतीय युवा मोर्चा मांद्रे अध्यक्ष रामा नाईक यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com