गोवा ऑलिंपिक भवनासाठी विद्यापीठानजीक जागेच्या प्रस्ताव ; राज्यपाल भगतसिंग कोश्यारींना मुख्यमंत्र्यांचे पत्र

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 22 डिसेंबर 2020

गोवा ऑलिंपिक भवनासाठी ताळगाव पठारावरील गोवा विद्यापीठ संकुलात दोन हजार चौरस मीटर जागेत वास्तू साकारण्याचा प्रस्ताव आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पत्र पाठविले आहे.

पणजी :  गोवा ऑलिंपिक भवनासाठी ताळगाव पठारावरील गोवा विद्यापीठ संकुलात दोन हजार चौरस मीटर जागेत वास्तू साकारण्याचा प्रस्ताव आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पत्र पाठविले आहे.

राज्यात ऑलिंपिक भवन होण्यासाठी गोवा ऑलिंपिक असोसिएशन (जीओए) प्रयत्नशील आहे. हा प्रकल्प महत्त्वाकांक्षी आहे. त्यासाठी राज्य सरकारने जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी जीओएने राज्य सरकारला केली आहे. त्यासंबंधीचे विनंती पत्र गेल्या १२ नोव्हेंबरला केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्या नेतृत्वाखालील जीओए शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन सादर केले होते. श्रीपाद नाईक हे जीओएचे अध्यक्षही आहेत.
जीओएने सादर केलेले पत्र मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी आता मंजुरीसाठी राज्यपालांकडे पाठविले आहे. सर्व सोपस्कार पार पाडल्यानंतर ऑलिंपिक भवनासाठी जागा उपलब्ध होईल आणि लगेच तेथे बहुउद्देशीय वास्तू साकारेल असा विश्वास जीओएच्या पदाधिकाऱ्यांना वाटत आहे.

 

अधिक वाचा :

विराट कोहली मायदेशातूनही टिम इंडियाला करणार चिअर अप..! 

 

संबंधित बातम्या