“प्रशिक्षक राहुल द्रविड आणि मेंटर धोनी टीम इंडियाला वेगळ्या उंचीवर पोहोचवतील ”

निवड समितीने माजी अध्यक्ष राहिलेल्या एमएसके प्रसाद (MSK Prasad) यांच्यासह आणखी दोन नावांना आपला पाठिंबा दिला असल्याचे सांगितले आहे.
“प्रशिक्षक राहुल द्रविड आणि मेंटर धोनी टीम इंडियाला वेगळ्या उंचीवर पोहोचवतील ”
Rahul Dravid & Mahendra Singh DhoniDainik Gomantak

मागील काही दिवसांपासून टीम इंडियामधील (Team India) वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले असताना दुसरीकडे मात्र भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांचा कार्यकाळ टी-ट्वेन्टी विश्वचषकनंतर (T-20 World Cup) संपणार आहे. शास्त्री यांनी स्वतः आपली ही स्पर्धा प्रशिक्षक म्हणून आपली अखेरची असेल असे जाहीर केले आहे. त्यामुळे टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक येत्या काळात कोण होणार याबातच्या चर्चांना उधान आले आहे. भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि फिरकीपटू अनिल कुंबळे (Anil Kumble) आणि दिग्गज फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS Laxman) यांची या पदासाठी वर्णी लागू शकते अशी चर्चाही सुरु झाली आहे. मात्र आता या दिग्गजांची नावे काहीशी मागे पडताना दिसत आहेत. त्याचवेळी निवड समितीने माजी अध्यक्ष राहिलेल्या एमएसके प्रसाद (MSK Prasad) यांच्यासह आणखी दोन नावांना आपला पाठिंबा दिला असल्याचे सांगितले आहे.

Rahul Dravid & Mahendra Singh Dhoni
अर्जुनच्या 'मुंबई इंडियन्स' प्रवेशावर बहिण सारा तेंडूलकरने दिली प्रतिक्रिया

हे प्रशिक्षक आणि मेंटर

टीम इंडियाचा माजी यष्टीरक्षक आणि निवड समितीचे अध्यक्ष राहिलेले प्रसाद हे सध्या आयपीएल २०२१ मध्ये तमिळ समालोचन करत आहेत. त्यांनी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये म्हटले की, रवी शास्रीनंतर टीम इंडियाचे प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी काम करावे. त्याचबरोबर महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) याने त्याच्यासोबत मेंटर म्हणून काम केल्यास टीम इंडिया एका वेगळ्या उंचीवर पोहोचेल असही त्यांनी यावेळी म्हटले. विशेष म्हणजे ते दोघेही शांत आणि संयमी असल्याचे सांगितले आहे. तसेच, प्रत्येक जण त्यांचा आदर करतो. दोघांच्याबी अनुभवाचा संघातील निश्चित फायदा होईल असही त्यांनी यावेळी सांगितले आहे.तसेच टीम इंडियातील अनेक खेळाडूंना राहुल द्रविडने घडवले आहेत. त्याचबरोबर अनेकांना कप्टन कूल अशी ओळख असणाऱ्या धोनीसोबत खेळण्याची संधीही मिळाली आहे. प्रसाद हे 2017 ते 2020 या कालावधीमध्ये टीम इंडियाच्या निवड समितीचे अध्यक्ष राहिले होते. अनेकदा आपल्या काही वक्तव्यांमुळे प्रसाद यांना टीकेचा सामना करावा लागला होता.

Rahul Dravid & Mahendra Singh Dhoni
'सेहवाग'च्या 'या' वक्तव्यामुळे 'मुंबई इंडियन्स'चे फॅन्स नाराज

कप्टन कूल संघाचा मेंटर

आगामी टी-ट्वेन्टी वर्ल्डकपसाठी बीसीसीआयने महेंद्रसिंग धोनीला मेंटर म्हणून पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षी महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. मात्र अजूनही आयपीएलमध्ये चेन्नईचे नेतृत्त्व करत आहे. दुसरीकडे द्रविडला क्रिकेट प्रशिक्षणाचा अफाट असा अनुभव आहे. द्रविडने भारतीय संघ, भारत अ, आणि भारतीय वरिष्ठ संघ अशा वेगवेगळ्या संघांचे प्रशिक्षक म्हणून काम पाहिले आहे.

Related Stories

No stories found.