घाईघाईने खेळवल्यास रोहितची दुखापत गंभीर होण्याचा धोका

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 2 नोव्हेंबर 2020

खेळाडूंच्या तंदुरुस्तीबाबतचा निर्णय वैद्यकीय अधिकारी घेत असतात. सघव्यवस्थापन त्यात थेट सहभागी होत नाही. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी निवड समितीस सादर केलेल्या अहवालानुसार निर्णय झाला आहे.

दुबई-  रोहित शर्माला घाईघाईने खेळवल्यास तो पुन्हा जखमी होण्याचा धोका आहे, असे निवड समितीस सादर केलेल्या वैद्यकीय अहवालात म्हटले होते, अशी माहिती भारतीय संघाचे मुख्य मार्गदर्शक रवी शास्त्री यांनी दिली. 
तंदुरुस्त नसल्याने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रोहित शर्माची निवड झालेली नाही. तंदुरुस्त नसल्याने रोहीतची निवड झाली नसल्याचे भारतीय मंडळाने जाहीर केल्यानंतर एखाद तासात मुंबई इंडियन्सने रोहित पुढे सरसावून फटकेबाजी करीत असल्याचा व्हिडीओ ट्विट केला होता. रोहित आयपीएलमधील चार सामन्यास मुकला आहे. त्याच्या  दुखापतीवरुन सुरु झालेला वाद शमवण्याचा काहीसा प्रयत्न रवी शास्त्री यांनी 
केला. 

खेळाडूंच्या तंदुरुस्तीबाबतचा निर्णय वैद्यकीय अधिकारी घेत असतात. सघव्यवस्थापन त्यात थेट सहभागी होत नाही. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी निवड समितीस सादर केलेल्या अहवालानुसार निर्णय झाला आहे. मी काही निवड समितीचा भाग नाही. मात्र पुन्हा खेळल्यास त्याला दुखापत होण्याचा धोका आहे, असे वैद्यकीय अहवालात म्हटले होते, एवढे मी जाणतो, असे रवी शास्त्री यांनी खाजगी वृत्तवाहिनीस दिलेल्या मुलाखतीत सांगितले. 

संबंधित बातम्या