न्यूझीलंडला मोठा धक्का; कॉलिन डी ग्रँडहोम कसोटी मालिकेतून बाहेर

यजमान इंग्लंडकडून (England) पहिली कसोटी पाच गडी राखून गमावल्यानंतर न्यूझीलंडचे संकट थांबण्याचे नाव घेत नाहीये.
Colin De Grandhomme
Colin De GrandhommeDainik Gomantak

यजमान इंग्लंडकडून पहिली कसोटी पाच गडी राखून गमावल्यानंतर न्यूझीलंडचे संकट थांबण्याचे नाव घेत नाहीये. किवी संघाचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू कॉलिन डी ग्रँडहोम दुखापतीमुळे इंग्लंडसोबत सुरु असलेल्या कसोटी मालिकेतील उर्वरित सामन्यांमधून बाहेर पडला आहे. लॉर्ड्स कसोटीच्या तिसऱ्या दिवशी ग्रँडहोमच्या टाचेला दुखापत झाली. (Colin De Grandhomme Ruled Out Of England Test Series Through Injury)

Colin De Grandhomme
IND vs NZ: न्यूझीलंडला नमवण्यासाठी संघांत 'यांची' एन्ट्री तर काहींना विश्रांती

दरम्यान, 35 वर्षीय ग्रँडहोमला आता दुखापतीतून सावरण्यासाठी 10 ते 12 आठवडे लागतील. कॉलिन डी ग्रँडहोमच्या जागी आता अष्टपैलू मिचेल ब्रेसवेलचा उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी न्यूझीलंड संघात समावेश करण्यात आला आहे. न्यूझीलंडचे प्रशिक्षक गॅरी स्टीड म्हणाले की, 'मालिकेच्या सुरुवातीला कॉलिनला दुखापत होणे अत्यंत दुर्दैवी आहे. तो आमच्या कसोटी संघाचा महत्त्वाचा भाग होता.'

तसेच, इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरी कसोटी शुक्रवारपासून ट्रेंट ब्रिजमध्ये सुरु होणार आहे. पहिल्या कसोटीत पाच गडी राखून पराभव पत्करावा लागल्यानंतर, न्यूझीलंड आता आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत काही गुण मिळविण्यासाठी दुसऱ्या कसोटीत पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल. डब्ल्यूटीसी पॉइंट टेबलमध्ये न्यूझीलंडचा संघ सातव्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर इंग्लंड आठव्या क्रमांकावर आहे.

Colin De Grandhomme
IND vs NZ: भारताला हरवण्यासाठी तब्बल 33 वर्षे संघर्ष करतोय न्यूझीलंड !

दुसरीकडे, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतर्गत खेळल्या गेलेल्या या सामन्यातील विजयासह इंग्लंडचा संघ 9व्या स्थानावरुन 8व्या स्थानावर पोहोचला आहे. त्याचवेळी पराभवामुळे न्यूझीलंडच्या संघाला सहाव्या स्थानावरुन सातव्या स्थानावर घसरला आहे. इंग्लंडच्या (England) विजयाची टक्केवारी आता 12.5 टक्क्यांवरुन 19.23 टक्क्यांवर गेली आहे. दुसरीकडे, जागतिक कसोटी चॅम्पियन न्यूझीलंडची विजयाची टक्केवारी 38.89 वरुन 33.33 वर घसरली आहे. याचा फायदा भारतीय संघाला मिळू शकतो.

याशिवाय, आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2021-23 पॉइंट टेबलमध्ये ऑस्ट्रेलिया 75 टक्के विजयाच्या टक्केवारीसह पहिल्या स्थानावर आहे, तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या (South Africa) संघाची विजयाची टक्केवारी 71.43 आहे. भारताचा संघ 58.33 टक्के गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याच वेळी, श्रीलंकेचा संघ चौथ्या क्रमांकावर आहे, ज्याची विजयाची टक्केवारी 55.56 आहे. पाचव्या क्रमांकावर पाकिस्तानचा संघ (52.38) आहे. वेस्ट इंडिज (35.71) सहाव्या आणि बांगलादेश (Bangladesh) (16.67) नवव्या स्थानावर आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com