'गोल्डन हॅटट्रिक'! दीपक पुनियाने पाकिस्तानी कुस्तीपटूला दिली मात, भारताने जिंकले 9 वे गोल्ड

Commonwealth Games: बर्मिंगहॅममध्ये शुक्रवारी भारतीय कुस्तीपटूंनी आपला जलवा दाखवून दिला.
Deepak Punia
Deepak PuniaDainik Gomantak

Commonwealth Games 2022: बर्मिंगहॅममध्ये शुक्रवारी भारतीय कुस्तीपटूंनी आपला जलवा दाखवून दिला. दीपक पुनियाच्या रुपाने भारताने कुस्तीमध्ये तिसरे पदक मिळवले. भारतासाठी दीपकआधी बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक सुवर्ण जिंकण्यात यशस्वी ठरले. दीपकचे हे पहिले राष्ट्रकुल सुवर्णपदक आहे. त्याने अंतिम फेरीत पाकिस्तानच्या मोहम्मद इनामचा पराभव केला.

दीपकने अप्रतिम केले

साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया (Bajrang Punia) यांच्यानंतर भारताच्या दीपक पुनियाने (Deepak Punia) कुस्तीमध्ये भारतासाठी (India) तिसरे सुवर्ण जिंकले आहे. राष्ट्रकुल 2022 मधील भारतासाठी हे एकूण 9 वे सुवर्णपदक आहे. दीपकने पाकिस्तानच्या मोहम्मद इनामचा 3-0 असा पराभव केला. पाकिस्तानी कुस्तीपटू 2 वेळा कॉमनवेल्थ गोल्ड मेडलिस्ट राहिला आहे.

Deepak Punia
Commonwealth Games: सुवर्णपदक विजेत्या पाकिस्तानी वेटलिफ्टर्सचे मीराबाईने केले अभिनंदन

साक्षीची शानदार कामगिरी

राष्ट्रकुल क्रीडा (Commonwealth Games) 2022 मध्ये शुक्रवारचा दिवस भारतीय कुस्तीपटूंसाठी गौरव प्रदान करुन देणारा ठरला. अंशू मलिक आणि बजरंग पुनिया यांच्या कुस्तीतील अप्रतिम कामगिरीनंतर भारताच्या साक्षी मलिकनेही आपली चुणूक दाखवली. साक्षीने तिच्या कारकिर्दीतील पहिले राष्ट्रकुल सुवर्णपदक जिंकले आहे. यापूर्वी साक्षीने एकदा रौप्य आणि कांस्यपदक जिंकले आहे. साक्षी मलिकने कॅनडाच्या (Canada) अ‍ॅना गोन्झालेझविरुद्धचा अंतिम सामना जिंकण्यात यश मिळवले.

Deepak Punia
Commonwealth Games 2022: मीराबाई चानूने रचला इतिहास, सुवर्णपदक केले नावावर

बजरंगलाही सुवर्ण मिळाले

त्याचवेळी भारताचा स्टार कुस्तीपटू बजरंग पुनियाने कुस्तीमध्ये पहिले सुवर्णपदक पटकावत आपली कमाल दाखवली आहे. बजरंगने गतवर्षीही राष्ट्रकुलमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. बजरंगने 65 किलो वजनी गटात अंतिम फेरीत कॅनडाच्या लचलान मॅकगिलचा 9-2 असा पराभव केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com