टेबल टेनिस प्रशिक्षकांविरुद्ध तक्रार
table tennis.

टेबल टेनिस प्रशिक्षकांविरुद्ध तक्रार

पणजी

गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या सेवेतील टेबल टेनिस प्रशिक्षकांच्या अनियमित आणि कामचुकार सेवेबद्दल गोवा टेबल टेनिस संघटनेच्या प्रसिद्धी आणि मीडिया विभागाचे अध्यक्ष संदीप हेबळे यांनी तक्रार केली आहे.

तक्रारीची प्रत त्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतक्रीडा सचिव जे. अशोक कुमारगोवा क्रीडा प्राधिकरणाचे कार्यकारी संचालक वसंत प्रभुदेसाईक्रीडा व युवा व्यवहार खात्याच्या संचालकांनाही पाठविली आहे. गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या सेवेतील संबंधित प्रशिक्षकावर कारवाई करण्याची मागणी हेबळे यांनी केली आहे. गेल्या दोन वर्षांपासून संबंधित प्रशिक्षकाबाबत तक्रारी असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

गोवा क्रीडा प्राधिकरणाने नियुक्त केलेल्या टेबल टेनिस प्रशिक्षकांच्या कामचुकारपणामुळे वास्को परिसरातील युवा-उदयोन्मुख टेबल टेनिसपटूंचे नुकसान होतेत्यांना प्रशिक्षणासाठी पणजीमडगाव येथील खासगी टेबल टेनिस प्रशिक्षण केंद्रात पदरमोड करून जावे लागते याकडे हेबळे यांनी लक्ष वेधले आहे. गोवा क्रीडा प्राधिकरणाने दुर्लक्ष केल्यामुळे संबंधित प्रशिक्षकाचे फावल्याचे आरोपही त्यांनी केला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसारगोव्यात दोघेच एनआयएस टेबल टेनिस प्रशिक्षक आहेतत्यापैकी एक क्रीडा व युवा व्यवहार खात्याच्यातर दुसरा गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या सेवेत आहे.

‘‘संबंधित प्रशिक्षकास त्यांना नेमून दिलेल्या कामात रस नाही. मी यासंदर्भात गोवा क्रीडा प्राधिकरणाचे कार्यकारी संचालक वसंत प्रभुदेसाईसंयुक्त संचालक (प्रशिक्षण) ब्रुनो कुतिन्हो यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांच्याकडून त्या प्रशिक्षकास ताकीद मिळू शकते किंवा दुसरीकडे बदलीही होऊ शकते. याप्रकरणी संबंधित प्रशिक्षकाकडून सुधारण्याची अपेक्षा आहे,’’ असे हेबळे यांनी सांगितले..

हेबळे यांनी दिलेल्या माहितीनुसारत्यांनी वास्को परिसरातील काही टेबल टेनिसपटूंशी संवाद साधला आहे.  टेबल टेनिस प्रशिक्षण केंद्रात १५-१६ खेळाडूंची नोंदणी आहे. प्रशिक्षक नसल्यामुळे या खेळाडूंना वैयक्तिकरीत्या सराव करावा लागतो. या खेळाडूंनी दिलेल्या माहितीनुसारसंबंधित टेबल टेनिस प्रशिक्षक फक्त हजेरीपटासाठी येतात आणि नंतर लगेच निघून जातात. कधीतरी या खेळाडूंसमवेत खेळतात आणि खेळाडूंसोबत छायाचित्र काढतातत्यांच्या स्वाक्षऱ्या घेतात आणि जातात. ‘‘कदाचित खात्याला दस्तऐवज सादर करण्यासाठी आणि आपण कार्यरत आहोत हे सिद्ध करण्यासाठी संबंधित प्रशिक्षक हे सारे करत असावा,’’  अशी शक्यता हेबळे यांनी व्यक्त केली.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com