रोहित आणि इशांतसाठी हातघाई; गुरुवारपर्यंत ऑस्ट्रेलियात दाखल होण्याचे आव्हान

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 24 नोव्हेंबर 2020

रोहित आणि इशांत या शर्मा द्वयीने लगेच प्रयाण न केल्यास ते कसोटी मालिकेसाठी सुरुवातीपासून उपलब्ध होण्याची शक्‍यता कमी आहे. दोघांवरही सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पुनर्वसन प्रक्रिया सुरू आहे.

सिडनी-भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मर्यादित षटकांच्या लढतींना शुक्रवारी सुरुवात होईल, पण प्रतिस्पर्ध्यांना वेध कसोटी मालिकेचे लागले आहेत. त्यामुळेच रोहित आणि इशांत शर्मा २६ नोव्हेंबरपर्यंत ऑस्ट्रेलियात दाखल न झाल्यास भारतीय संघासमोरील आव्हान कसोटी मालिकेच्यावेळी जास्त खडतर होणार आहे.

रोहित आणि इशांत या शर्मा द्वयीने लगेच प्रयाण न केल्यास ते कसोटी मालिकेसाठी सुरुवातीपासून उपलब्ध होण्याची शक्‍यता कमी आहे. दोघांवरही सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पुनर्वसन प्रक्रिया सुरू आहे. आयपीएलदरम्यान दोघेही जखमी झाले होते. 
रोहितची राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत चाचणी सुरू आहे. रोहित तसेच इशांतला किती ब्रेक हवा याचा निर्णय अकादमीतील मार्गदर्शकच घेतील. मात्र त्यांच्यावरील उपचार लांबल्यास प्रश्‍न बिकट होतील. ऑस्ट्रेलियात आल्यावर दोघांना विलगीकरणात रहावे लागणार आहे. त्यात दीर्घ ब्रेकनंतर लगेच कसोटी खेळणे त्यांच्यासाठी आव्हानात्मक असेल, याकडे भारतीय क्रिकेट संघाचे मार्गदर्शक रवी शास्त्री यांनी लक्ष वेधले.

कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने ऑस्ट्रेलियात सध्या परदेशातून येणाऱ्या प्रत्येकासाठी १४ दिवसांचे विलगीकरण सक्तीचे आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिका १७ डिसेंबरपासून होणार आहे. या मालिकेसाठीचा सराव सामना भारतीय संघ ११ डिसेंबरपासून खेळणार आहे. आता रोहित आणि इशांतने या सामन्यात खेळणे अपेक्षित आहे. त्यासाठी त्यांचे विलगीकरण १० डिसेंबरला संपण्याची गरज आहे. त्यासाठी त्यांना ऑस्ट्रेलियात २६ नोव्हेंबरपर्यंत पोहोचणे गरजेचे 
आहे.

रोहित मर्यादित षटकांच्या लढतीत खेळणार नाही हे निश्‍चित आहे. सध्या रोहित तसेच इशांतला किती विश्रांतीची गरज आहे, हेच ठरवावे लागेल. जास्त विश्रांतीही घेतल्यास त्याचा तोटा होतो. आता कसोटी खेळायची असेल, तर त्या दोघांनी दोन तीन दिवसांत ऑस्ट्रेलियाकडे निघण्याची गरज आहे. हे न घडल्यास आव्हान खडतर होईल, असेही शास्त्री यांनी नमूद केले.सिडनी, ता. २३ ः भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मर्यादित षटकांच्या लढतींना शुक्रवारी सुरुवात होईल, पण प्रतिस्पर्ध्यांना वेध कसोटी मालिकेचे लागले आहेत. त्यामुळेच रोहित आणि इशांत शर्मा २६ नोव्हेंबरपर्यंत ऑस्ट्रेलियात दाखल न झाल्यास भारतीय संघासमोरील आव्हान कसोटी मालिकेच्यावेळी जास्त खडतर होणार आहे.
रोहित आणि इशांत या शर्मा द्वयीने लगेच प्रयाण न केल्यास ते कसोटी मालिकेसाठी सुरुवातीपासून उपलब्ध होण्याची शक्‍यता कमी आहे. दोघांवरही सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पुनर्वसन प्रक्रिया सुरू आहे. आयपीएलदरम्यान दोघेही जखमी झाले होते. 
रोहितची राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत चाचणी सुरू आहे. रोहित तसेच इशांतला किती ब्रेक हवा याचा निर्णय अकादमीतील मार्गदर्शकच घेतील. मात्र त्यांच्यावरील उपचार लांबल्यास प्रश्‍न बिकट होतील. ऑस्ट्रेलियात आल्यावर दोघांना विलगीकरणात रहावे लागणार आहे. त्यात दीर्घ ब्रेकनंतर लगेच कसोटी खेळणे त्यांच्यासाठी आव्हानात्मक असेल, याकडे भारतीय क्रिकेट संघाचे मार्गदर्शक रवी शास्त्री यांनी लक्ष वेधले.

कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने ऑस्ट्रेलियात सध्या परदेशातून येणाऱ्या प्रत्येकासाठी १४ दिवसांचे विलगीकरण सक्तीचे आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिका १७ डिसेंबरपासून होणार आहे. या मालिकेसाठीचा सराव सामना भारतीय संघ ११ डिसेंबरपासून खेळणार आहे. आता रोहित आणि इशांतने या सामन्यात खेळणे अपेक्षित आहे. त्यासाठी त्यांचे विलगीकरण १० डिसेंबरला संपण्याची गरज आहे. त्यासाठी त्यांना ऑस्ट्रेलियात २६ नोव्हेंबरपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे.

रोहित मर्यादित षटकांच्या लढतीत खेळणार नाही हे निश्‍चित आहे. सध्या रोहित तसेच इशांतला किती विश्रांतीची गरज आहे, हेच ठरवावे लागेल. जास्त विश्रांतीही घेतल्यास त्याचा तोटा होतो. आता कसोटी खेळायची असेल, तर त्या दोघांनी दोन तीन दिवसांत ऑस्ट्रेलियाकडे निघण्याची गरज आहे. हे न घडल्यास आव्हान खडतर होईल, असेही शास्त्री यांनी नमूद केले.

संबंधित बातम्या