टीम इंडियाने कसोटी मालिका जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 19 जानेवारी 2021

गेल्या 100 वर्षात गाबा मैदानावर ऑस्ट्रेलिया एकदाही पराभूत झालेला नव्हता. भारताने अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली ही किमया करून दाखवली. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र यांनी टीम इंडीयाचे मनोबल वाढवत  शुभेच्छा दिल्या.

ब्रिस्बेन : रिषभ पंतने शेवटच्या सत्रात केलेल्या धमाकेदार फलंदाजीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाविरूद्धचा ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर खेळवला जाणारा चौथा कसोटी सामना जिंकत मालिका आपल्या खिशात घातली. वॉशिंग्टन सुंदर आणि रिषभ पंत यांनी शेवटच्या क्षणी सुरेख खेळी करत 18 चेंडू राखून भारताला सामना जिंकून दिला. भारताने 3 गडी राखत हा सामना जिंकला. 

या विजयामुळे भारताने ऑस्ट्रेलियाचा विक्रम मोडित काढला आहे. गेल्या 100 वर्षात गाबा मैदानावर ऑस्ट्रेलिया एकदाही पराभूत झालेला नव्हता. भारताने अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली ही किमया करून दाखवली.दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीम इंडीयाचे मनोबल वाढवत  शुभेच्छा दिल्या.

रिषभ पंत 89 तर नवदिप सैनी 0 धावा करून नाबाद राहिले. आज चांगला खेळ केलेल्या शुभमन गीलला शतकाने हुलकावणी दिली. त्याला 146 चेंडूत 91 धावा करता आल्या. त्याच्यानंतर आलेला कर्णधार अजिंक्य रहाणे 24 धावा करत स्वस्तात परतला. आजच्या पाचव्या दिवसाच्या खेळासाठी भारताकडून मैदानात उतरलेल्या शुभमन गीलने चांगली खेळी करत अर्धशतक झळकावलं.
 

संबंधित बातम्या