कोरोनाच्या भीतीने बॅडमिंटनच्या जैवसुरक्षित शिबिरासाठी आग्रह

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 18 ऑगस्ट 2020

राष्ट्रीय शिबिरातील खेळाडू आणि मार्गदर्शकांचा अन्य व्यक्तींशी संपर्क टाळणेच योग्य होईल, असे माजी विजेत्या अरविंद भटने सांगितले. 

हैदराबाद: बॅडमिंटन शिबिरातील सिक्की रेड्डीला कोरोनाची बाधा झाल्याचे वृत्त आल्यामुळे सर्वांना धक्का बसला होता. त्यामुळे हे शिबिर जैवसुरक्षित वातावरणात घेण्याची सूचना होत आहे. या शिबिरातील खेळाडूंचा मुक्काम शिबिराच्या ठिकाणी नसल्यामुळे त्याचे आयोजन सुरक्षित नसल्याचा आक्षेप घेतला जात आहे. 

सिंधूचे वडील रमण्णा आपल्या मुलीला शिबिराच्या वेळी कोरोनाची लागण होऊ नये, यासाठी कमालीचे सतर्क आहेत. कोर्टचे निर्जंतुकीकरण सरावापूर्वी होईल, याकडे ते लक्ष देत आहेत. त्याचबरोबर सिंधू सराव करणार असलेली शटलही सातत्याने वेगळी राहतील, याकडेही ते लक्ष देत आहेत. त्यांनी प्रत्येक खेळाडूसाठी एक मार्गदर्शक नेमल्यास संपर्क कमी होऊ शकेल, अशीही सूचना केली आहे. 

राष्ट्रीय शिबिरातील खेळाडू आणि मार्गदर्शकांचा अन्य व्यक्तींशी संपर्क टाळणेच योग्य होईल, असे माजी विजेत्या अरविंद भटने सांगितले. 

राष्ट्रीय शिबिरास पुन्हा सुरुवात
सिक्की रेड्डी कोरोना चाचणीत पॉझिटिव ठरल्याने स्थगित झालेल्या शिबिरास पुन्हा सुरुवात झाली आहे. भारतीय बॅडमिंटन महासंघाच्या या सराव शिबिरासाठी ८ खेळाडूंना परवानगी आहे; पण चौघेच दाखल झाले आहेत. साईना अकादमीबाहेर सराव करीत आहे. चिराग शेट्टी -सात्विकसाईराज, अश्विनी पोनप्पा हे अद्याप हैदराबादमध्ये आलेले नाहीत. त्यामुळे सध्या अकादमीत सिंधू, श्रीकांत आणि साईप्रणितच सराव करीत आहेत.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या