Corona Vaccine: भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने घेतली कोरोना लस

दैनिक गोमंतक
सोमवार, 10 मे 2021

भारताचा कर्णधार विराट कोहलीने  आज कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला.

भारताचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) आज कोरोना प्रतिबंधक लसीचा (Corona Vaccine) पहिला डोस घेतला. कोहलीने प्रत्येकाला शक्य तितक्या लवकर लस घेण्याचे आवाहन केले आहे. सोमवारी भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा (Ishant Sharma) आणि पत्नी प्रतिमा सिंह यांनीही कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. गेल्या आठवड्यात उमेश यादव, अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane), आणि शिखर धवन (Shikhar Dhawan) यांनीही कोरोना लसीचा पहिला डोस घेतला होता. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) चा अंतिम सामान खेळण्यासाठी भारतीय संघ न्यूझीलंडला जाणार आहे. त्या संघात रहाणे, उमेश, इशांत आणि कोहली यांचा समावेश आहे. (Corona vaccine taken by Indian captain Virat Kohli)

IPL 2021: 'या' 4 देशांनी दिली उर्वरित आयपीएल घेण्याची ऑफर

एका माध्यमाशी बोलताना भारतीय नियामक मंडळाचे (BCCI) अधिकारी म्हणाले, 2 जूनला भारतीय संघ यूके दौर्‍यावर जाणार आहे. भारतीय कसोटी क्रिकेटपटूंचे लसीकरण पूर्ण होण्यासाठी आणखी काही काळ लागेल. "भारत सरकारने 18 वर्षांवरील प्रत्येक व्यक्तीसाठी लसीकरण सुरू केले आहे जेणेकरुन खेळाडू आपला पहिला डोस घेऊ शकतात. परंतु दुसरा डोसचा प्रश्न आहे. बीसीसीआय इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाशी बोलणे करून दुसरा डोस खेळाडूंना तिकडे मिळू शकतो का? याच्या विचारात आहे". दुसऱ्या डोससाठी जर यूके सरकारने मंजूर दिली नाही तर आमच्याकडून दुसर्‍या डोसची लस भारतातून घेतली जाईल. असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. 

माजी ऑलिंपियन फुटबॉलपटू फ्रांको यांचे निधन

डब्ल्यूटीसीचा अंतिम सामना 18 जून रोजी होणार असून 22 जूनपर्यंत आरक्षित दिवस म्हणून कायम राहील. सुरुवातीला लॉर्ड्स येथे खेळायचे ठरवले जात असताना, आयसीसीने जगभरातील  कोरोनाच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून साऊथॅम्प्टनला हलविण्याचे ठरवले.शुक्रवारी बीसीसीआयच्या 20 खेळाडूचा संघ जाहीर केला आहे. चार स्टँडबाय खेळाडूंपैकी वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा कोरोना पॉझिटिव्ह आहे.

संबंधित बातम्या