Shikhar Dhawan Wife: 'या' गोष्टी करू नकोस..., शिखरच्या पत्नीला कोर्टानं खडसावलं

शिखर धवनने याचिका दाखल केल्यानंतर कोर्टाने त्याची विभक्त पत्नी आयेशा मुखर्जीला ताकीद दिली आहे.
Shikhar Dhawan with Wife
Shikhar Dhawan with Wife Dainik Gomantak

Shikhar Dhawan: भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवन सध्या त्याच्या कौटुंबिक कारणामुळे चर्चेत आला आहे. दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने त्याची विभक्त पत्नी आयेशा मुखर्जीला आदेश दिले आहेत की तिने त्याच्याविरुद्ध बदनामी करणारे कोणतेही वक्तव्य करू नये.

सध्या धवन आणि आयेशा यांच्या घटस्फोटाची केस सुरू आहे. त्याचदरम्यान धवनने कोर्टमध्ये याचिका दाखल केली होती की आयेशा त्याची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे या प्रकरणात कोर्टाकडून धवनला दिलासा मिळाला असून त्याच्याविरुद्ध असे न करण्याचा आदेश आयेशाला देण्यात आला आहे.

Shikhar Dhawan with Wife
Shikhar Dhawan: 'गोष्ट जय-पराजयाची नाहीच...', टीम इंडियातून वगळल्यानंतर धवनची पोस्ट चर्चेत

रिपोर्ट्सनुसार धवनने जी याचिका दाखल केली होती, त्याच म्हटले होते की आयेशा त्याची कारकिर्द बरबाद करण्याबद्दल धमकावत होती. तसेच तिने काही बदनामीकारक संदेशही पसरवले होते.

या प्रकरणात पटियाला हाऊस कोर्टाचे न्यायाधीश हरिश कुमार यांनी आयेशाला आदेश दिले आहेत की तिने धवनविरुद्ध सोशल मीडिया, प्रिंट मिडिया, मित्रपरिवार आणि नातेवाईक यांच्याबरोबरच कोणत्याही व्यक्तीसमोर किंवा कोणत्याही ठिकाणी बदनामीकारक आणि खोटी माहिती पसरवू नये.

तसेच हरिश कुमार यांनी असेही सांगितले आहे की जर आयेशाच्या काही तक्रारी असतील, तर तिला संबंधित प्राधिकरणाकडे तक्रार करण्यापासून रोखता येणार नाही. पण तक्रारीआधी तिला त्याच्याविरुद्ध कोणतेही बदनामीकारक वक्तव्य करता येणार नाही.

याबरोबरच कोर्टाने धवनला त्याच्या 9 वर्षीय मुलाबरोबर रोज अर्धातास व्हिडिओ कॉलवर बोलण्याची परवानगी देऊ केली आहे.

Shikhar Dhawan with Wife
Shikhar Dhawan: गब्बरची मोठी घोषणा, या दौऱ्यापासून भारत वनडे वर्ल्ड कपची तयारी सुरु करणार!

दरम्यान, धवन आणि आयेशा यांचे 2012 साली लग्न झाले होते. त्यावेळी आयेशाला आधीच्या लग्नापासून दोन मुलीही होत्या. पण त्यांना धवनने स्विकारले होते. धवन आणि आयेशा यांना लग्नानंतर 2014 मध्ये मुलगा झाला, ज्याचे नाव जोरावर आहे. सध्या तो आयेशाजवळ आहे. धवन आणि आयेशा 2020 पासून वेगळे राहातात.

धवन सध्या भारतीय संघातून बाहेर आहे. तो गेल्या काही काळापासून फॉर्मसाठी संघर्ष करत आहे. आता त्याला त्याचा फॉर्म सिद्ध करून पुन्हा भारतीय संघात पुनरागमन करण्याची अपेक्षा असणार आहे. पण त्याच्यासाठी पुनरागमन करणे आता सोपे राहिलेले नाही. कारण शुभमन गिल आणि ईशान किशन यांनी गेल्या काही काळात चांगली कामगिरी केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com