पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला छळ आणि ब्लॅकमेल प्रकरणी न्यायालयाने दिला दणका

Babar Azam
Babar Azam

लाहोर: लाहोरच्या सत्र न्यायालयाने फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीला (एफआयए) पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम याच्यावर छळ आणि ब्लॅकमेल केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, हमीझा मुख्तार यांनी बाबर आझमसह आणखी दोन जणांवर यासंदर्भात आरोप दाखल केला होता. आणि त्यानंतर न्यायालयाने बाबर आझमवर छळ आणि ब्लॅकमेल केल्याच्या आरोपाखालील गुन्हा दाखल करण्यास सांगितले आहे. (Court orders to file charges against Pakistan captain Babar Azam)    

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये एका पत्रकार परिषदेत हमीझाने बाबरवर अत्याचार केल्याचा आरोप केला होता. या पत्रकार परिषदेत हमीझा मुख्तार यांनी बाबर आझमची शाळेतील सोबती असल्याचा दावा करत, बाबर आझम हा जवळजवळ दहा वर्षांपासून आपले शोषण करत असल्याचे म्हटले होते. आणि तिच्या या आरोपानंतर एकच खळबळ उडाली होती. याशिवाय, पाकिस्तानच्या एका पत्रकाराने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये हमीझा मुख्तार या न्याय मागत असल्याचे समोर आले होते. इतकेच नाही तर बाबर आझमची आथिर्क परिस्थिती ठीक नसताना तिने त्याला आथिर्क पाठबळ दिल्याचा दावाही या व्हिडिओ मधून तिने  केल्याचे पाहायला मिळाले होते.  

याशिवाय, गेल्या वर्षी या महिलेने न्यायालयात जात दखल देण्याची विनंती केली होती. व त्यानंतर न्यायालयाने पोलिसांना या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिले होते. परंतु याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. त्यानंतर या महिलेने एफआयएकडे तक्रार दाखल करत, अज्ञात लोकांकडून आपल्याला धमकीचे मेसेज आणि कॉल येत असल्याचा आरोप केला होता. व त्यानंतर झालेल्या चौकशीत धमकीचे मेसेज आणि कॉल आलेल्या नंबरपैकी एक हा पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजमच्या नावावर नोंदविण्यात आल्याचे समोर आले होते. आणि याच कारणावरून बाबर आझमला एफआयएसमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र त्याच्या ऐवजी बाबर आझमचा भाऊ फैसल आझम हजर होत त्याने अजून वेळेची मागणी केली होती.   

यानंतर, बाबर आझम (Babar Azam) हजर होत नसल्यामुळे एफआयएने आपल्या अहवालात त्याचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्कर्ष काढला होता. व त्यानंतर आता न्यायाधीश हमीद हुसेन यांनी गुरुवारी एफआयएला कायदेशीर गोष्टीनंतर दोषींवर ठराविक मुदतीत एफआयआर नोंदवण्याच्या संदर्भात पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.    

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com