‘सायकलिंग’ला गोवा खंडपीठाचा दणका! जाणून घ्या काय आहे प्रकरण?

राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेसाठी वादग्रस्त पार्श्वभूमीवर आपली गोवा राज्य संघात निवड न झाल्याबद्दल डॉ. ब्लांश हिने ‘सायकलिंग असोसिएशन ऑफ गोवा’ विरोधात न्यायालयात दाद मागितली होती.
‘सायकलिंग’ला गोवा खंडपीठाचा दणका! जाणून 
घ्या काय आहे प्रकरण?
Court ruled against cycling association of Goa Decided in favor of Dr Blanche ThemudoDainik Gomantak

पणजी: मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने बुधवारी गोवा सायकलिंग संघटनेस अयोग्य संघनिवडीबद्दल दणका दिला. नावेली येथील डॉ. ब्लांश थेमुडो हिची त्वरित संघात निवड करण्याचा आदेश न्यायालयाने दिला. आगामी राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेसाठी वादग्रस्त पार्श्वभूमीवर आपली गोवा राज्य संघात निवड न झाल्याबद्दल डॉ. ब्लांश हिने ‘सायकलिंग असोसिएशन ऑफ गोवा’ विरोधात न्यायालयात दाद मागितली होती. त्यावर सुनावणी होऊन न्यायालयाने सायकलपटूच्या बाजूने निर्णय दिला.

Court ruled against cycling association of Goa Decided in favor of Dr Blanche Themudo
Goa Police Football Cup धेंपो क्लब अंतिम फेरीत..

उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे व न्यायमूर्ती एम. एस. जवळकर यांनी या प्रकरणी 13 पानी आदेश बुधवारी जारी केला. त्यात याचिकादार डॉ. ब्लांश थेमुडो हिचे नाव राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेसाठी गोवा संघातर्फे एलिट महिला गटासाठी भारतीय सायकलिंग फेडरेशनकडे आजच्या आज पाठविण्याचा आदेश दिला. राष्ट्रीय स्पर्धा हरियानातील कुरुक्षेत्र येथे 25 ते 28 नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे. न्यायालयाच्या आदेशात, राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजक असलेल्या भारतीय सायकलिंग महासंघास निर्देश देण्यात आले आहेत, की त्यांनी प्रवेशिका सादर करण्याच्या तारखेनंतर याचिकादाराच्या नावाची नोंदणी होत असल्याच्या कारणास्तव नाकारू नये.

Court ruled against cycling association of Goa Decided in favor of Dr Blanche Themudo
वेळसावची कळंगुट असोसिएशनवर मात..!

काय आहे प्रकरण?

  1. सायकलिंग असोसिएशन ऑफ गोवा (सीएजी) यांच्यातर्फे राष्ट्रीय रोड रेसिंग सायकलिंग स्पर्धेसाठी 6 व 7 नोव्हेंबरला राज्यातील सायकलपटूंसाठी राज्य संघ निवडण्यासाठी चाचणी शिबिर घेण्यात आले.

  2. डॉ. ब्लांश कार्यरत दंतवैद्य असून सायकलपटूही आहेत. निवड चाचणीत डॉ. ब्लांश एलिट महिलांच्या गटातील 20 किलोमीटर टाईम ट्रायल आणि 80 किलोमीटर मास स्टार्ट रेस शर्यतीत अव्वल क्रमांकावर राहिल्या. तिच्या निवडीसाठी हे निकष पुरेसे ठरणारे होते.

  3. सायकलिंग महासंघाला प्रवेशिका पाठविण्याच्या दोन दिवस अगोदर 13 नोव्हेंबरला गोवा संघाची यादी जाहीर करण्यात आल्यानंतर वाद उफाळून आला. या यादीत डॉ. ब्लांशचे नाव नव्हते.

  4. निराश झालेल्या डॉ. ब्लांशने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात ‘सीएजी’विरोधात याचिका दाखल केली. राष्ट्रीय स्पर्धेसाठी आपल्याला गोवा संघात योग्यतेनुसार जागा मिळावी अशी मागणी खेळाडूने याचिकेत केली.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com