Simon Longstaff बनले ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचे पहिले एथिक्स कमिश्नर

Australia Cricket Board: ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाने (CA) मंगळवारी सिमोन लाँगस्टाफ यांची एथिक्स कमिश्नर म्हणून नियुक्ती केली.
 Simon Longstaff
Simon LongstaffDainik Gomantak

Australia Cricket Board: ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाने (CA) मंगळवारी सिमोन लाँगस्टाफ यांची एथिक्स कमिश्नर म्हणून नियुक्ती केली. बॉल-टू-बॉल टॅम्परिंग प्रकरणाने जागतिक क्रिकेटला हादरवून सोडले होते. लॉंगस्टाफ यापूर्वी 2018 मध्ये ऑस्ट्रेलियाशी क्रिकेटशी संबंधित होते. तत्कालीन कर्णधार स्टीव्ह स्मिथ, उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि क्रिकेटपटू कॅमेरुन बॅनक्रॉफ्ट या सर्वांवर या प्रकरणात बंदी घालण्यात आली होती.

दरम्यान, लॉंगस्टाफ यांनी या घटनेच्या केलेल्या पुनरावलोकनामुळे बोर्डाचे तत्कालीन अध्यक्ष डेव्हिड पीव्हर यांना राजीनामा द्यावा लागला होता. CA प्रेस रिलीझनुसार, "डॉ. लाँगस्टाफ यांनी 2018 मध्ये एथिक्स सेंटरचे कार्यकारी संचालक म्हणून ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये (Cricket) स्वतंत्र संस्थात्मक पुनरावलोकनाचे नेतृत्व केले." त्यानुसार, 'सीएने या अहवालातील बहुतेक शिफारशींवर कृती केली होती. डॉ. लाँगस्टाफ यांनी पुनरावलोकनात बजावलेली महत्त्वाची भूमिका पाहता ते या पदासाठी आदर्श उमेदवार आहेत'.

 Simon Longstaff
ICC Women's World Cup : ऑस्ट्रेलिया सातव्यांदा विश्वविजेता

दुसरीकडे, बॅनक्रॉफ्ट 2018 मध्ये दक्षिण आफ्रिका (South Africa) दौऱ्यावर केपटाऊन कसोटीदरम्यान सॅंडपेपर वापरताना दिसला होता. त्याने चेंडूशी छेडछाड केली होती. नंतर स्मिथ आणि वॉर्नर यांनाही या प्रकरणात बंदी घालण्यात आली. कारण तेही यात सहभागी होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com