या क्रिकेटपटूने अचानक केली निवृत्ती जाहीर, लैंगिक शोषणाप्रकरणी भोगला होता तुरुंगवास

Bangladesh Cricket Team: बांगलादेशचा दिग्गज वेगवान गोलंदाज रुबेल हुसेनने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे.
Bangladesh cricket team
Bangladesh cricket teamDainik Gomantak

Bangladesh Cricket Team: बांगलादेशचा दिग्गज वेगवान गोलंदाज रुबेल हुसेनने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. हुसेनने अचानक निवृत्ती जाहीर केली आहे. रुबेल हुसेनने कसोटी क्रिकेटला अलविदा केला आहे.

या क्रिकेटपटूने अचानक निवृत्ती जाहीर केली

रुबेल हुसेनने बांगलादेशकडून (Bangladesh) 27 कसोटी सामन्यात 36 विकेट घेतल्या आहेत. रुबेल हुसेनने 2009 साली कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. रुबेल हुसेनची कसोटी क्रिकेटमधील (Test Cricket) सर्वोत्तम गोलंदाजी म्हणजे 166 धावांत 5 बळी. या सामन्यात हुसेनने एकूण 210 धावा केल्या. त्याचा इकॉनॉमी रेट 3.93 आहे.

Bangladesh cricket team
Bangladesh संघाला मिळाली 'श्रीरामाची' साथ; आशिया चषकापूर्वी नवी रणनिती

बलात्काराचाही आरोप

रुबेल हुसेनवर 2015 साली बलात्काराचा आरोप झाला होता. एका बांगलादेशी अभिनेत्रीने रुबेल हुसेनवर लग्नाच्या बहाण्याने बलात्कार केल्याचा आरोप केला होता. खरे तर, 2015 मध्ये बांगलादेशी अभिनेत्री नाजनीन अख्तरने रुबेल हुसेनवर बलात्काराचा आरोप केला होता.

Bangladesh cricket team
Bangladesh Fuel Price Hike : श्रीलंकेपाठोपाठ आता बांगलादेशही आर्थिक संकटात; इंधनाच्या किमतीत ऐतिहासिक वाढ

तुरुंगाची हवा खाल्ली

या प्रकरणात रुबेल हुसेनची मोठी बदनामी झाली होती. त्याला तीन दिवस तुरुंगातही राहावे लागले होते. विशेष म्हणजे, रुबेल हुसेनला 2015 च्या विश्वचषकापूर्वी जामीन मिळाला होता. त्याने विश्वचषकात शानदार कामगिरी केली होती. यानंतर बांगलादेशी अभिनेत्री नाजनीन अख्तरनेही आपला खटला मागे घेतला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com