INDvsENG: क्रिकेट चाहत्यांना स्टेडियममध्ये उपस्थिती लावण्यासाठी आणखी वाट पाहावी लागणार 

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 20 जानेवारी 2021

ऑस्ट्रेलिया सोबतच्या कसोटी मालिकेनंतर भारतीय संघ आता इंग्लंड सोबत चार सामन्यांची कसोटी मालिका मायदेशात खेळणार आहे. इंग्लंड विरुद्धच्या मालिकेतील पहिले दोन सामने चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहेत.

ऑस्ट्रेलिया सोबतच्या कसोटी मालिकेनंतर भारतीय संघ आता इंग्लंड सोबत चार सामन्यांची कसोटी मालिका मायदेशात खेळणार आहे. इंग्लंड विरुद्धच्या मालिकेतील पहिले दोन सामने चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहेत. तर उर्वरित दोन सामने अहमदाबादच्या नवीन सरदार वल्लभभाई पटेल (मोटेरा) स्टेडियमवर खेळण्याचे नियोजन आहे. मात्र चेन्नईत खेळवण्यात येणाऱ्या पहिल्या दोन्ही सामन्यांसाठी स्टेडियमवर प्रेक्षकांना परवानगी नाकारण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे भारत-इंग्लंड यांच्यातील पहिल्या दोन्ही सामन्यांच्यावेळेस स्टेडियम मध्ये चाहत्यांना उपस्थिती लावता येणार नाही. 

कोरोनाच्या संकटानंतर भारतीय संघ पहिल्यांदाच ऑस्ट्रेलिया सोबतच्या मालिकेतून मैदानावर उतरला होता. व या मालिकेतील काही सामन्यांच्या नंतर प्रेक्षकांना स्टेडियमवर उपस्थिती लावण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र आता कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर भारतात पुन्हा एकदा क्रिकेटला सुरवात होणार असून, इंग्लंडचा संघ भारतात दाखल होणार आहे. आणि यावेळेस चेन्नईत होत असलेल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये दर्शकांना उपस्थिती लावता येणार नाही. क्रीडा जग सामान्य स्थितीत परत येत असतानाही तमिळनाडू क्रिकेट असोसिएशनने (टीएनसीए) देशातील कोरोनाजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रेक्षकांना स्टेडियम मध्ये परवानगी देण्यात येणार नसल्याचे म्हटले आहे. खेळाडूंच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे टीएनसीए म्हटले आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना  5 फेब्रुवारीला खेळवण्यात येणार आहे. तर दुसरा कसोटी सामना 13 फेब्रुवारी रोजी होईल.       

आयएसएल : एटीके मोहन बागानच्या आक्रमणाची कसोटी

दरम्यान, मंगळवारी चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने इंग्लंड सोबतच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा केली होती. त्यानुसार विराट कोहली, हार्दिक पांड्या आणि ईशांत शर्मा यांची आगामी कसोटीसाठी संघात पुनरागमन झाले आहे. तर ऑस्ट्रेलिया विरुद्ध पदार्पण केलेल्या टी नटराजन, पृथ्वी शॉ आणि नवदीप सैनी यांना इंग्लंड विरुद्धच्या दोन कसोटी सामन्यासाठी वगळण्यात आले आहे. याशिवाय जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज व शार्दुल ठाकुर यांचे संघातील स्थान कायम असून, प्रियांक पांचाळ, केएस भारत, अभिमन्यु एस्वरन, शाहबाज नदीम आणि राहुल चाहर या पाच जणांना अतिरिक्त खेळाडू म्हणून निवडण्यात आले आहे.  

भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, शुभमन गिल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, वृद्धिमान साहा, हार्दिक पांड्या, केएल राहुल, रिषभ पंत, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, आर अश्विन, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल 

 

संबंधित बातम्या