Samson Gesture Towards Jaiswal: सॅमसनने जयस्वालसाठी जे केले, ते पाहून चाहत्यांना आठवले 9 वर्षांपूर्वीचे धोनी-कोहली

गुरुवारी झालेल्या आयपीएल सामन्यात संजू सॅमसनने यशस्वी जयस्वालसाठी केलेलं कृत्य पाहून अनेकांना धोनी-कोहलीची आठवण झाली.
MS Dhoni | Virat Kohli | Sanju Samson | Yashasvi Jaiswal
MS Dhoni | Virat Kohli | Sanju Samson | Yashasvi JaiswalDainik Gomantak

Sanju Samson Gesture Towards Yashasvi Jaiswal: इंडियन प्रीमीयर लीग 2023 स्पर्धेत गुरुवारी (11 मे) कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात ईडन गार्डन्सवर सामना पार पडला. या सामन्यात राजस्थानने सहज 9 विकेट्सने विजय मिळवला. दरम्यान, या सामन्याच्या अखेरीस घडलेल्या एका घटनेमुळे अनेक क्रिकेट चाहत्यांना एमएस धोनी आणि विराट कोहली यांच्या जोडीची आठवण झाली.

झाले असे की या सामन्यात 13 वे षटक सुरू असताना राजस्थानकडून फलंदाजी करताना सलामीवर यशस्वी जयस्वाल नव्वदीत पोहोचला होता. तसेच त्याच्याबरोबर कर्णधार संजू सॅमसन फलंदाजी करत होता. यावेळी 5 व्या चेंडूवर जयस्वालने एकेरी धाव काढली आणि तो 94 धावांवर पोहोचला. तसेच राजस्थानला विजयासाठी 3 धावांची गरज होती.

त्यानंतर सहाव्या चेंडूवर सॅमसनने एकही धाव काढली नाही. त्यामुळे 14 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर जयस्वालला स्ट्राईक मिळणार होती. त्यामुळे सॅमसनने त्याच्याकडे पाहून षटकार मार असा इशारा केला. त्याला यातून सांगायचे होते की षटकार मार म्हणजे त्याचे शतकही पूर्ण होईल आणि संघही विजयी होईल.

पण, जयस्वालनेही 14 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर षटकाराचा प्रयत्न केला मात्र, चेंडू चौकारासाठी गेला. त्यामुळे राजस्थानचा विजय झाला. तसेच जयस्वाल 47 चेंडूत 98 धावांवर नाबाद राहिला. त्याचबरोबर सॅमसन 48 धावांवर नाबाद राहिला. यादरम्यान जयस्वालने 13 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले होते. त्यामुळे त्याच्या नावावर आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतकाचा विक्रमही नोंदवला गेला.

दरम्यान, सॅमसनने 13 व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर जयस्वालसाठी केलेल्या कृतीनंतर चाहत्यांना 2014 टी20 वर्ल्डकपमध्ये धोनीने विराटसाठी केलेल्या कृतीची आठवण झाली. त्यावेळी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात विराट 68 धावांवर फलंदाजी करत होता आणि त्याच्या या खेळीमुळे भारतीय संघ विजयापर्यंत पोहचला होता.

त्यावेळी विराटने विजयी धाव घ्यावी, या हेतूने 19 व्या षटकातील अखेरचा चेंडूवर धोनीने एकही धाव घेतली नव्हती आणि त्यावेळी भारताला विजयासाठी 1 धावेचीच गरज होती. त्यामुळे धोनीने विराटला खुणावले होते की विजयी धाव तू घे. त्यानंतर विराटने 20 व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर विजयी चौकार ठोकला होता.

राजस्थानचा विजय

या सामन्यात सॅमसन आणि जयस्वाल या दोघांमध्ये नाबाद 121 धावांची भागीदारीही झाली. त्यामुळे 13.1 षटकातच 1 विकेट गमावत राजस्थानने कोलकाताने दिलेल्या 150 धावांच्या आव्हानाचा पाठलाग यशस्वी पूर्ण केला.

तत्पुर्वी, कोलकाताने या सामन्यान प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 9 बाद 149 धावा उभारल्या होत्या. कोलकाताकडून वेंकटेश अय्यरने सर्वाधिक 57 धावांची खेळी केली. तसेच कर्णधार नितीश राणाने 22 धावांची खेळी केली. अन्य कोणाला खास काही करता आले नाही. राजस्थानकडून युजवेंद्र चहलने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com