Cricket Match Tickets: 20 रुपयात मिळतयं क्रिकेट सामन्याचं तिकिट! कारण जाणून चाहत्यांच्या डोळ्यात पाणी

Cricket Match Tickets in Pakistan: भारत आणि पाकिस्तानमधील चाहत्यांची क्रिकेट सामने पाहण्याची क्रेझ कोणापासूनही लपलेली नाही.
Stadium
StadiumDainik Gomantak

Cricket Match Tickets in Pakistan: भारत आणि पाकिस्तानमधील चाहत्यांची क्रिकेट सामने पाहण्याची क्रेझ कोणापासूनही लपलेली नाही. सामना जर टी-20 फॉरमॅटचा असेल तर मग विचारायचीच सोय नाही. तिकिटांची किंमतही खूप जास्त असते.

मात्र, क्रिकेट सामन्याची तिकिटे फुकट मिळत असतील तर काय हरकत आहे. होय, हे भारताच्या शेजारी देश पाकिस्तानमध्ये घडत आहे, जिथे क्रिकेट सामन्याचे तिकीट फक्त 20 रुपये (पाकिस्तानी चलन) मध्ये मिळत आहे.

पाकिस्तानात तिकीट स्वस्त

पाकिस्तानची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट आहे. या देशावरील कर्ज दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. देशात पीठ, डाळी, तेल यासारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. पाकिस्तान (Pakistan) सरकारकडे कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठीही पैसे नाहीत.

Stadium
Babar Azam: जागतिक क्रिकेटवर बाबरचा दबदबा, विराट-रोहितला मागे टाकत रचला इतिहास!

दुसरीकडे, आर्थिक संकटाचा परिणाम प्रत्येक क्षेत्रावर दिसून येत असून क्रीडा क्षेत्रही यापासून दूर राहिलेले नाही. दरम्यान, सामन्याचे तिकीट दर फक्त 20 रुपये ठेवण्यात आले आहेत. बाबर आझम (Babar Azam), शाहिद आफ्रिदी, सरफराज अहमद, उमर अकमल आणि नसीम शाह यांसारखे दिग्गज क्रिकेटपटू या प्रदर्शनीय सामन्यात खेळताना दिसणार आहेत.

बाबर आझम आणि सरफराज यांच्या संघांमधील सामना

आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर देशात पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) आयोजित करण्यात येत आहे. या सामन्यापूर्वी बाबर आझम आणि सरफराज खान यांच्या संघांमध्ये एक प्रदर्शनीय सामना खेळवला जाणार आहे.

5 फेब्रुवारीला होणाऱ्या या टी-20 सामन्याची तिकिटे केवळ 20 रुपयांना (पाकिस्तानी चलन) विकली जात आहेत. भारतीय चलनात त्याची किंमत सुमारे 6-7 रुपये आहे. बलुचिस्तान क्रिकेट असोसिएशनतर्फे पेशावर झल्मी आणि क्वेटा ग्लॅडिएटर्स यांच्यातील प्रदर्शनीय सामन्याचे आयोजन करण्यात येणार आहे.

Stadium
Babar Azam: प्रायव्हेट व्हिडिओ लीक प्रकरणानंतर बाबरचे पहिले ट्वीट, म्हणाला...

क्वेट्टा येथे सामना होणार आहे

हा सामना 5 फेब्रुवारीला क्वेट्टा येथील बुगाती स्टेडियमवर होणार आहे. पाकिस्तान संघाचा सध्याचा कर्णधार बाबर आझम या सामन्यात पेशावर जाल्मीचे नेतृत्व करणार आहे. त्याचवेळी सर्फराज अहमद क्वेटा ग्लॅडिएटर्सची जबाबदारी सांभाळणार आहे. इतकी स्वस्त तिकिटे मिळण्याचे कारण काय, हे समजण्यापलीकडचे आहे.

देशातील वाढत्या महागाईमुळे सामन्याऐवजी इतर महत्त्वाच्या गोष्टींसाठी आणि अधिकाधिक लोकांना स्टेडियममध्ये आणण्यासाठी आयोजकांनी हे पैसे वाचवण्यासाठी केल्याचे मानले जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com