क्रिकेट वेस्टइंडीजने केला दिग्गज खेळाडू सर क्लाइव लॉयड चा सन्मान

क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक, क्लाइव्ह लॉइड यांना त्यांच्या क्रिकेटमधील सेवांसाठी सन्मानित करण्यात आले आहे.
क्रिकेट वेस्टइंडीजने केला दिग्गज खेळाडू सर क्लाइव लॉयड चा सन्मान
Cricket West Indies honors Sir Clive Lloyd on receiving his Knighthoodtwitter/@windiescricket

क्रिकेट वेस्ट इंडिज (CWI) ने वेस्ट इंडिजचे (West Indies) दिग्गज सर क्लाइव्ह लॉइड (Sir Clive Lloyd) यांना नाइटहूड (Knighthood) मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे. क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक, क्लाइव्ह लॉइड यांना त्यांच्या क्रिकेटमधील सेवांसाठी सन्मानित करण्यात आले आहे. बुधवारी ड्यूक ऑफ केंब्रिज यांच्या हस्ते विंडसर कॅसल येथे त्यांचा सन्मान करण्यात आला.

Cricket West Indies honors Sir Clive Lloyd on receiving his Knighthood
IND vs SA: केपटाऊनमध्ये ऋषभ पंतचा शतकी जलवा

CWI चे अध्यक्ष रिकी स्केरिट म्हणाले, "HLCWI आणि वेस्ट इंडीज क्रिकेटमध्ये सहभागी असलेल्या सर्वांच्या वतीने, मी सर क्लाइव्ह यांचे या सन्मानासाठी मनापासून अभिनंदन करू इच्छितो. सर क्लाइव्ह यांचे क्रिकेटच्या इतिहासात विशेष स्थान आहे. पहिला क्रिकेट विश्वचषक जिंकणाऱ्या या खेळाडूने वेस्ट इंडिजचा जगभर गौरव केला. यावेळी पुढे बोलतांना म्हणाले, “लॉर्ड्सचा विजय हा वेस्ट इंडिज क्रिकेटमधील अत्यंत महत्त्वाचा क्षण होता जेव्हा आम्ही सर क्लाइव्हच्या नेतृत्वाखाली जगातील सर्वोत्तम संघ असल्याचे सिध्द केले होते.”

यावेळी क्रिकेट चाहत्यांनी सुद्धा या पुरस्काराचे स्वागत केले. सर क्लाइव्हच्या नेतृत्वाने 1975 मध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात लॉर्ड्सवर यांनी ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. चार वर्षांनंतर त्यांनी पुन्हा वेस्ट इंडिजला विश्वविजेतेपदावर नेले. यावेळी त्यांनी ऐतिहासिक स्थळी इंग्लंडचा पराभव केला होता.

Cricket West Indies honors Sir Clive Lloyd on receiving his Knighthood
Ind VS SA: 145 वर्षांच्या कसोटी इतिहासात जे कधीही घडले नाही ते...

क्लाइव्ह यांनी 110 कसोटी आणि 87 एकदिवसीय सामने खेळले आणि ते आतापर्यंतच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक ठरले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली, संघाने 27 कसोटी सामने खेळले, ज्यात सलग 11 विजयांचा समावेश होता. ते वेस्ट इंडिज संघाचे माजी व्यवस्थापक आणि निवडकर्ता आणि ICC मैच रेफरी देखील राहिले आहे. 2009 मध्ये त्यांना आयसीसी क्रिकेट हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट करण्यात आले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com