गोव्याला झोडपलेल्या क्रिकेटपटूचे अकाली निधन

टी-20 स्पर्धेत अवी बारोटने केल्या होत्या 53 चेंडूंत झंझावाती 122 धावा
Cricketer Avi Barot has passed away prematurely age of 29
Cricketer Avi Barot has passed away prematurely age of 29Dainik Gomantak

पणजी: सय्यद मुश्ताक अली करंडक टी-20 क्रिकेट स्पर्धेत इंदूर येथील होळकर स्टेडियमवर गोव्याच्या गोलंदाजांना पळता भुई थोडी केलेल्या सौराष्ट्राच्या अवी बारोट या क्रिकेटपटूचे वयाच्या 29व्या वर्षी अकाली निधन झाले.

अवी हा भारताच्या 19 वर्षांखालील क्रिकेट संघाचे माजी कर्णधार होता, तसेच 2019-20 मोसमात रणजी करंडक जिंकलेल्या सौराष्ट्र संघाचा सदस्य होता. त्याचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची माहिती सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने दिली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शहा यांच्यासह क्रिकेट विश्वातील दिग्गजांनी शोक व्यक्त केला आहे.

Cricketer Avi Barot has passed away prematurely age of 29
टीम इंडियाला अखेर द्रविडच्या रुपात मिळाला 'कोच'

देशांतर्गत क्रिकेटमध्ये अवी याने हरियाना, तसेच गुजरातचेही प्रतिनिधित्व केले होते. शुक्रवारी आयपीएल स्पर्धेची अंतिम लढत पाहत असताना अहमदाबाद येथील निवासस्थानी त्याचे निधन झाल्याचे वृत्त आहे. पाच दिवसांपूर्वी त्याने राजकोटमधील टी-20 स्पर्धेत 43 चेंडूंत झंझावाती 72 धावा केल्या होत्या.

गोव्याविरुद्ध तुफानी खेळी

गोवा आणि सौराष्ट्र यांच्यातील टी-20 सामना यावर्षी 15 जानेवारी रोजी इंदूरमधील होळकर स्टेडियमवर झाला होता. अवी गोव्याविरुद्ध सलामीस मैदानात उतरला व त्याने तुफानी फटकेबाजी केली. स्पर्धेत विदर्भाविरुद्ध अगोदरच्या लढतीत 93 धावांवार बाद झालेल्या अवीने कारकिर्दीतील पहिले टी-20 शतक झळकाविले. गोवाच्या गोलंदाजांवर वर्चस्व राखताना त्याने समर्थ व्यास याच्यासमवेत दुसऱ्या विकेटसाठी 111 धावांची भागीदारी केली. अवीला गोव्याचा एकही गोलंदाज बाद करू शकला नाही, अखेरीस तो धावबाद झाला. त्याने कारकिर्दीतील सर्वोत्तम टी-20 कामगिरी नोंदविताना 53 चेंडूंत ११ चौकार व सात षटकारांच्या मदतीने 122 धावा केल्या. त्याने 44 चेंडूंत शतक पूर्ण केले होते.

Cricketer Avi Barot has passed away prematurely age of 29
गतविजेत्या स्पोर्टिंगची विजयी सलामी!

अष्टपैलू क्रिकेटपटू

यष्टीरक्षक-फलंदाज, तसेच ऑफ-ब्रेक गोलंदाजीही टाकणारा अवी बारोट अष्टपैलू क्रिकेटपटू होता. 2011 साली त्याने भारताच्या 19 वर्षांखालील संघाचे नेतृत्व केले होते. 2016-17 पासून तो सौराष्ट्र क्रिकेट संघाचा नियमित सदस्य होता. अवीने 38 प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यांत 24.95च्या सरासरीने 1547 धावा केल्या, त्यात एक शतक व नऊ अर्धशतकांचा समावेश होता. ३८ लिस्ट ए सामन्यात त्याने आठ अर्धशतकांसह 1030 धावा केल्या. याव्यतिरिक्त20 टी-20सामन्यांत एक शतक व पाच अर्धशतकांसह 37.73 च्या सरासरीने 717 धावा केल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com